Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २४४

श्री
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०

पुरवणी राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे गोसावी यांसीः-

विनंति उपरी. आपण बरखोडेविशीं लिहिलें कीं, थोडक्या कामासाठीं राजश्री हरीपंततात्या यांचे चित्तांत संशय पडतो, याजकरितां मल्हारजी फडके यांसी मनाई करून पत्र पाठवावें, त्यांणीं सनद आणिली त्यावरून सर्वास आश्चर्य वाटतें. ऐशियास, आह्मीं जहागिरीची सनद दिली. परंतु फडके यांणीं समक्ष कबूल करून बोलिला जे, मी नाइकास पत्रें दाखवून त्याचे सांगितलेप्रमाणें तात्याचे मर्जीनुरूप घडून आल्यास बंदोबस्त करून घेऊ. तुह्मांस न सांगतां परभारा बखेडा केला. असो. त्याजला माघती पत्र सादर असे. मुजाहीम होणार नाहीं. आपण राजश्री तात्या यांसीं समाधानाचेंच बोलावें. कळावें छ ९ माहे जिल्हेज. बहुत काय
लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती मोर्तबसुद.