Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २२३.
श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध १३
पो मिति भाद्रपद वा १० सोमवार.
श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामींचे सेवेसीं:-
सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आज छ १२ रोजीं सुरतेहून बातमी आली कीं, शहराहून इंग्रजानें कूच करून, कामरेज पाठीशीं देऊन, मुक्काम केला. भडोचकर व सुरतकर मेस्तर बाटम ऐसे बाहेर निघाले आहेत. मुंबईकर जनराल तेहि सरंजामसुधां येणार, . बंगाल्याहून पंधरा सोळा हजार माणूस आलें, त्यांचीं पत्रें नागपूरचे मुकामींहून आली. त्यावरून हे सर्व बाहेर निघाले. श्रीमंत राजश्री दादासाहेब शहरांतच आहेत. राजश्री बापूजी होळकरहि कागदीं पत्रीं मिळाले ! श्रीमंतांस सामील होणार. नागपुरीहून लोक येतील, त्यासमागमें भोंसल्याकडील फौज येत आहे, ऐसी वदंता आहे. रा राजाराम गोविंद यांची रवानगी महीउत्तरतीरीं होत आहे. समागमें दोन पलटणें दिलीं. वरकड झाडून इंग्रज घाटावर फौजेसुद्धां जाणार, सोनगडास राहणार, ऐसेंहि बोलतात, लाला मुनशी विसां दिवसांचा करार करून गेले आहेत. त्यांचा मार्ग पाहतात. तदनुसार करणें तें करीतील. परंतु जनचर्चा कीं, नागपुरींहून लोक आले ह्मणजे देशीं जातील. याप्रमाणें बातमी आली. ते आपणांस लिा आहे. सत्यमिथ्या नकळे. कूच होऊन बाहेर आले. वे अमदाबादेकडे फौजेची रवानगी. दोन गोष्टी तो प्रमाण आहेत. येविशीं यजमान साहेबांनी आपणांस व कारभारी यांस लिा आहे, त्यावरून अवगत होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.