मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२०

श्री.
१७०१ भाद्रपद वद्य ८
पो मिती आश्विन शुा ५ गुरुवार

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता छ २२ माहे रमजान पर्यत यथास्थित असे. विशेष. आपण भाद्रपद शुा ९ चीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिा सविस्तर कळलें. दरबारी मजकूर लिा व ऐवजाविर्सी निकडीनें लिहिलें. त्यास, येथून पर्याय लिहिलें तरी आपणांस प्रमाणे वाटत नाहीं. अस्तु ! ऐवजाची रवानगी केली आहे. पावतील. वरकड योगीराजाचा वगैरे संशय मनांत आणून लिा. व आह्याकडील कोण्ही न्यून्य बोलणार ते समजावीत असतील, त्यास, यजमानसाहेबांची निष्ठा श्रीमंतांस, दुसरी कोण्हे कालीं होणार नाहीं. हे खातरजमा आपणांस असेलच. वरकड आमचा विचार आपल्याशिवाय किमपि होणार नाहीं. शिंदे यांजकडील राजकारण राखावें. त्यास, ते येथें आले आहेत. आपले नजरेस येईल तसें करावें. येविसींचे पेशजीं सविस्तर लिा आहे. त्या अन्वयें बंदोबस्त करावा. गकार. नामक यांसी कामांत घ्यावें न घ्यावें तें लिहावें ऐसे लिहिलें. त्यास, त्यांची पत्रें आह्मांकडे आलीं होतीं. त्यास, आह्मी लिहिलें कीं, नाईकांची मर्जीनरूप राहून काम करित जावें. त्यास, आपण त्याची खातरजमा करून घेऊन कामांत असों द्यावें. सारांश, आपली खातरजमा होत असेल त्याप्रमाणें करावें, तोच आमचा विचार, वरकड रा बाळठाकूर यांसी काल येथने रा केले आहेत. लवकरच येऊन पोंचतील, त्याजवरून कळेल, बहुत काय लिहिणें कृपालोभ असों दीजे हे विज्ञप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries