Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २२१.
श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध ५
श्रीमंत राजश्री बाळाजीनाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-
पो बाळाजी महादेव सां नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता भाद्रपद शुा पंचमी मुा बडोदें यथास्थित असे. विशेष, राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर यांजकडे सरकारचा ऐवज येणें, याजकरितां मजला श्रीमंत राजश्री नानास्वामी व तात्या या उभयतांनी आज्ञा करू. न घनश्याम नारायण याजबराबर रवाना केलें. ते मशारनिल्हे याजसमागमें दुसाणियास आलों. पुढें बडोदियास यावें तों अंताजी नागेश यांचें पत्र घनबास आलें कीं, तुह्मीं बडोदियास न येणें; माघारें, मार्गांत आला असला तरी जाऊन दुसाणियास राहणें. येथून आमचें पत्र यावयाकरितां येईल तेव्हां येणें. याप्रमाणें तापीतीरीं पत्रे आलियावर मारनिल्हे माघारे निघोन दुसाणियास चालले. राजश्री बापूजीपंत सुद्धा आह्मीं उभयतांनीं विचारिलें की, दुसाणियास चलावें, तेथून तुमचे आमचे विचारें ठरेल तसें करूं. त्या जवर दुसाणीं गेलों. तेथपावेतों बापूचा आमचा स्नेह सामान्य होता. पुढें विचार पडला कीं, घनबा गोपाळराव यांस याच यजमानाची आज्ञा, या प्रों यांनीं केलें. पुढें तुमची आमची गत काय ? तेव्हां बापूचा आमचा स्नेह, निखालसतेचा परस्परें खातरजमा होऊन जाहाला, तो कोणे गोष्टीवर आपण म्हणतील तरी, बापूचे ठायीं आपले लक्ष चांगलें व आपलेंही त्यांचे ठायीं निखालसतेचें असें दिसोन आलें. माझा प्रकार ह्मणावा तरी श्रीमंत नाना स्वामीस माझी माहितगार निखालस, सेवक असे जातीची फारशी नाहीं. परंतु, श्रीमंत तात्या स्वामीचे ठाई माझें लक्ष कसें, मजकडून लाभाचा मोहो पडून तात्यांचे पायांशीं दुसरा भाव धरीन व सरकार काम नाशीन, असे जातीची बुध होईल न होईल हें तात्यांचें चित्त जाणत असेल. सर्व प्रकारे प्राण गेला तर द्यावा, हा हेत धरून तात्यांचे पायांशीं अंतर न करावे, असे जातीची परिक्षा असेल, याजकरितां मजला या कामास पाठविले हे जाणोन, राजश्री बापूजीपंत आह्मी उभयतां एकत्र जालों. उभयतांचे भाव स्वामीसेवेवरी सारिखे जाले तेव्हां स्नेह पडला. धनबाच, अंतोबाची आचरणे बापूंस पेशजीं समजली होती. मजला सांप्रत समजली. याजमुळे उभयतांनी एक विचार करून दुसाणयापासून सोनगड निघालों, घनबाचे समाधान राखेन त्याचे विचारें निघालों. अंतर्यामींचा भाव स्वामीकार्य करावे, हा होता. कारण घनबाची मर्जी राखोन, महत संकटानें प्राणास उदक घालोन मार्गातून निघालों असतां, स्वामीसेवेवर एकनिष्ठ माझा तात्यांचे पायांसी दुसरा भाव नाहीं. तेणें प्रों बापूंचा तुमचे ठायीं नाहीं. ह्मणून पकडून बडोदियास पावल. येथे येऊन प्रथम फत्तेसिंगरावसुद्धा अंतोबाची भेट झाली. रंग पाहतां या उभयतांत वैमनस्य ! तेथे आह्मां उभतांस कोण पुसतो ? त्यांत श्रीमंत दादासाहेब या प्रांतें इंग्रजांस येऊन भेटले, याजमुळें आमचें तेज वाढणें कळतच आहे. त्यांत कारस्थानीं करून, अंतोबाचे ठायीं ममता पेशजीपेक्षां फार दाखऊन उभयतांचें वैमनस्य, मागील रंग, अंतोबा काय सांगतो हा प्रकार समजोन घेऊन तपसीलवार अंतोबाची जबानीचा मजकूर साहा बंद लिहून, अम् ( त ) राम भगवत याजसमागमें लाखोटियावर तुमचें नांव घालोन तुमचे विद्यमानें तेथें उभयतां यजमानास विनंती प्रविष्ट करावी, असें सांगोन रवाना केली. नंतर दुसरा प्रकारः माहितगारीचा परिभ्रम नसतां विहंगममार्गेकडून बातमी घेऊन तपशीलवार पत्रें, बापूनीं आपल्यास, मी तात्यास, याप्रमाणें लिहून छ २५ रजबीं रवाना केलीं तीं पावली असतील, त्याजवरून, कांहीं माणूस कारस्तानीचे, असें, आपल्यास व श्रीमंत तात्यास आमचे सुकृतेंकडून चित्ताचे ठायीं वाटलियास, मोठी योग्यता मिळेल, असें भासत असतां, मध्येंच स्तब्ध जालें. आपल्याकडील पत्रांची उत्तरेंच येईनात. तों इकडे फत्तेसिंगराव अंतोबाचें फारच विटून फतेसिंगराव यांणी अंतोबास कैद केलें. गोविंद गोपाळ कारभार करूं लागले. माजी आपल्याकडे सूत्र लाविलें तेंहि चांगलेच केलें. आपले आज्ञेशिवाय आमचे संमत गोविंद मामांस न पडलें असें खरेंच, परंतु हजारकोस उभयतां गेलों