Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २१९.

श्री.
१७०१ श्रावण अखेर

पो मिति भाद्रपद शुा १ मंदवार.
श्रीमंत राजश्री बाळाजीनाईक नाना स्वामीचे सेवेसी:-

सेवक गोविंद गोपाळ. साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. येथून पत्रें एक दोन शेवेसी पाठविलीं तीं पावलींच असतील. त्यावरून निवेदन जालें असेल, दरबारचा बंदोबस्त यथास्थितपणें राखावा. इकडील कांहीं चिंता न करावी. ऐवजाचे तरतुदींत असो. पक्केपणाचें बोलणें आमचें व राजश्री बापूजी नरसी यांचे करुन मागाहून सविस्तर लेहून पाठवितों. दरबारचीं पत्रें घेतलीं आहेत, तीं पाठवितों, ह्मणून एक दोन पत्रीं लिहिलीं असतां, अद्याप येत नाहींत. तरी तीं पत्रें पाठवावीं. चिरंजीव राजश्री नारोबानाना आपणापाशी आणलेच असतील, तत्राप, आले नसले तरी बहुतशी वोढ न करावी. रा शिंदे यांजकडील बंदोबस्त करून घ्यावा. वरकड, पेशजीं बापूजी नरसी व बाळाजी महादेव यांनी आपणांस व सरकारांत पत्रें लिहिलीं आहेत. त्यावरून सविस्तर अवगत जालें असेल. दोन चार वेळां आपणाकडे पत्रें रवाना केलीं असतां, आपल्यास पत्रें पावल्याचें उत्तर येत नाहीं हें काय समजत नाहीं. मार्गांत कांहीं दिकत पडली असेल तर नकळे. आपण येथील बंदोबस्त करून घेतला आहे. तो पक्केंपणेंच असेल. पत्रें पाठवून द्यावीं. मार्गाची सावधतेविशीं ताकीद काशिदास करावी. वरकड येथील सर्व आपणाशिवाय कांहीं दुसरा अर्थ नाहीं. सेवेसीं श्रुत रोय हे विज्ञप्ति.