मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२७.

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध १.
पो मिती कार्तिक शुद्ध २ बुधवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:–

सेवक गोविंद गोपाळ सां नमस्कार विनंती. येथील कुशल ताइत छ २९ माहे रमजान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण भाद्रपद शुद्ध ९ पत्र पाठविलें तें पावलें. लिा सविस्तर अवगत जाहालें. पत्रीं ऐवजाकरितां निकडीनें लिहिलें, व घनःशाम नारायण शिंदे यांचे लष्करांत गेले आहेत. त्याजवरून उभयतां सरदार यांचीं पत्रें कारभारी यांस आलीं कीं, गायकवाडाकडील गृहस्थ आला आहे. दौलत गोविंदरायास द्यावी, सरकारचे व आपले पैक्याची निशा करून देवितों. तीं पत्रें व जिन्नस आपल्यास दाखविलीं. त्यावर आपण खातरजमेचे बोलले आणि मुदत करून पत्रें आह्मांस लिा. त्यास येथील प्रकार दररोज काय ल्याहावा ? राजश्री बाळाजी अनंत रानडे जाऊन बहुत दिवस जाले. आपणापासीं पोंहचून अद्याप उत्तर येत नाहीं. त्यास, मारनिले पावलियावर सविस्तर समजलियांत आलें असेल, त्याजवर विशेष प्रजन्य गेला यामुळें चहूंकडून ( संकट) प्राप्त जालें आहे. पीक गेले. मुलूखगिरी.........ध याजमुळें राहिली. यांत ईश्वर काय परिणाम लावील तो खरा. या दौलतींत कांहीं बाकी राहिली नाहीं. वोढघस्तेखालीं बहुतच आली आहे. यंदांचे साल सरकारांतून निभाऊन घेतल्यास कांहीं उभी राहील, नाहींतरीं परिणाम लागणें कठीण आहे. परस्परें समजल्यांत येईल तें खरें, बहुत काय लिहिणें? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries