Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२२.

श्री.
१७०१ भाद्रपद.

विज्ञापना ऐसीजे. राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर यांचे बोलणें की अंताजी नागेश याचें बहुत प्रकारें मनोधारण करीत होतों की, तुमचा कारभार तुह्मीं करून शिबंदी, सरकार, सावकार यांचा फड (शा) करणें. माझा पेशजीपासून इतबार तुमचे जागां. व सर्व तुह्मीं येख्त्यारीनेंच करीत होतां त्याप्रों करणें, तें न होय, तेव्हां कैद केलें. त्यापक्षीं हिशेब घेणें प्राप्त. अंताजी नागेश यांजकडेस सुरत अठ्ठाविसी वगैरे माहालची मामलत. त्याचे हिशेबाचे फडशे होणें. याशिवाय सरकारांत ऐवज मशारनिल्हे यांनी किती दिला व आह्मांकडून महालचा नख्त रवानगीसुद्धां मारनिले यांजकडे काय पावला, याचा झाडा समजला पाहिजे, बाकी निघालियास तिचा फडशा होणें. आणि अंतोबा यांनी तो सातपुडियांत मवास, कोळी यांजपासून पाहाडी किल्ला पंचवीस हजार रुो देऊन घेतला आहे. तेथें ऐवज व मुलें माणसें सुा जाऊन पावलियास ठीक नाहीं. याजकरितां सरकारांतून बंदोबस्त होऊन मजबुदी जाली पाहिजे. व घन:शाम नारायण वगैरे शिंदे यांजकडून बखेडे करवितील. याची सूचना होऊन बखेडा न होय असा बंदोबस्त जाला पाहिजे. याजकरितां सेवेसी सांगितल्यावरून विनंती लिहिली आहे. सेवेसी श्रत होय. हे विज्ञापना.