Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२१.

श्री.
१७०१ भाद्रपद शुद्ध ५

तसे आपली खातरजमा बापूविशी व माझी खातरजमा श्रीमंत तात्यांस याप्रमाणें माझेंहि लक्ष्य त्यांचे पायाजवळ असे. त्यांचे पाय जाणत असतील, जें करमें तें कच्चें लिहून आज्ञा आणऊन पुढें कर्तव्य तें करावें. असें असतां, आपण गोविंद गोपाळ यांचे उत्तराबराबर बापूंस चिठी लिहिली ती मारनिले यांनीं न देतां, आपल्याकडे दुसरें पत्र लिहून पाठविलें. नंतर आपली चिठी आठा रोजांनी दाखविली. चिठी पाहतांच बापूनीं उत्तर केलें कीं, यजमानाची आज्ञा मान्य. तो मजकूर मजलाहि कळला, मीहि उत्तर केलें कीं, तेथें नाईक व तात्या एक जागां, त्यांचा परस्परें दुसरा भाव नाहीं, जे नाईक यांची आज्ञा तेच तात्यांची. याप्रमाणें आपले ठिकाणीं विचार करून गोविंद गोपाळ यांचे लक्षांत चालू लागलों. ऐवजास मार्ग पुसों लागलों, अंतोबाचें लक्ष तेथें श्रीमंतांचे पायाशीं विपरीत जालें. याजमुळें फळ पावला. तो प्रकार सविस्तर पेशजीं लिा आहें, त्याजवरून समजलाच असेल. ह्मणजे अंतोबाचें लक्ष कसें, हेंहि लिहून पाठविलें.दुसरे छ २५ रजबीं गुप्त अर्थ लिहिला. त्यांत फत्तेसिंगराव यांचें लक्ष कसें, अंतोबाचें कृत्रिम कसे जातीचें, पुढें मोठी गोष्ट सांप्रत काळींचे प्रसंगांत हाताखाली असावी याजकरितां आपलेकडे पक्केपणें लिा आणि गुप्तच राखावी असें सुचविलें. तिसरें गोंदबा मामांचें संधान व फत्तेसिंग याचें एकविचाराचें आहे. आपल्याशीं अंतर होणार नाहीं. हें राखोन आज्ञा मानण्याचा मार्ग पाहिला. आज्ञा लवकर न आली. याजमुळें येथें उभयतांस बोध करून, राजश्री बाळाजीपंत, रानडे यांज समागमें तपशीलवार आपल्यास लिहून, आपले विचारें सरकारऐवजाचा निकाल पडावा, आपल्याशीं व तात्याशीं यांचा दुसरा भाव नसावा, हे अर्थ कित्तेक केले असतां, आपण गोविंद गोपाळ यांचे पत्रांचे उत्तर व बापूंस बोलावणें व खातरजमा पडे असें जातीच्या चिठ्या तेथील उभयतां यजमानांच्या घेऊन परभारें पाठविल्या. याजवरून आमचें लक्ष लोभाचें किंवा स्वामीकार्यावर मेहनत करून कारस्तानी केली याचें फळ व बक्षीस जन्माचें आज फावलें असें जालें. परंतु, आमची आपल्याशी एकनिष्ट चांगलीच आहे. याजमुळे येथें गोविंद गोपाळ यांनी अकृत्रीम लोभ करावा, असे यांस ईश्वरें बुध दिली. याजमुळें आपलीं पत्रें आलीं तीं दाखविलीं. परंतु आपण इतका विचार न केला कीं, आपली आज्ञा मोडीत असे जातीचे सेवक नाहींत. तेव्हा पुन्हां त्याच पत्राचें उत्तर ल्याहावें होते कीं, आमचें पत्र त्यांस दाखवावें. तें न ऐकतां अंतोबाचे लक्षीं राहिल्यास याप्रों करुं. तें न जालें. याजवरून बहुत चित्ताचे ठाई आनंद जाला. आजपावेतों येखत्यारी येथे लौकिकांत आहे अशी वाटत होती, ते सर्वत्रांस समजली. वरकड फारसा विषय नाहीं. श्रीमंत तात्यानीं आपली हातचिठी दिली, त्यांत माझें नांव नाही. तेव्हां पुढें येथे मातबरीची अथवा तेथील तात्यांचे विश्वासाचे आहेत नाहींत याची रीत यांस समजलीच असेल. असो. आह्मी सेवक सेवा करून असावें. परंतु यांत आमचें कांहीं भूषण कमी होतें असें नाहीं. ज्यांचे ह्मणवितों त्यांस चांगलें दिसतें करावें. आमचें तो मंगळसूत्र आहे. तेथें विभिचारपण ईश्वर घडू देणार नाहीं. आजपावेतों तात्यांचे ठायीं कसे रीतीचें लक्ष, हें पत्रीं काय लिहूं! मोठे राजकारण बाळाजी माहादेव यांस सांगितलें तरी चिंता नाहीं, ऐसे जातीची माझी निष्ठा, तात्या स्वामींची खातरजमा असतां, अंतोबांच व गायकवाड यांचे कामास पाठविलें. हे दोसी. यांचे सहवासामुळें आमचे ठाई तेथें आपल्यास विक्रत आली. कशी ह्मणतील तरी बापूंचा भरवसा आपल्यास न पडे, असें वाटल्यामुळें गोंदबा मामास परभारें पत्र लिहिलें. माझे ठाईं तात्या स्वामीची आली. याजमुळें खातरजमेची चिठी गोंदबास पाठविली. त्यांत माझें नांवच नाहीं ! तेव्हां तात्यांचे परम आप्त असे येथे सांगतात, तें उगेच, असें यांस वाटावें इतकाच प्रकार, एरवी आमची चित्तवृत्ति एकनिष्ठतेची आहे. त्यापक्षी आह्मांकडून वांकडे पाऊल पडणार नाहीं. पडेल ते दिवशी पुन्हां चरणदर्शनास येणार नाहीं. असे जातीची तात्यांचे पायापाशीं माझी प्रतिज्ञा व आपल्यापाशीं बापूंची, यांत अंतर नाहीं. बापू व मी उभयतां येथें एकत्रपणें आहों. याजमुळें यांसहि येथें समजलेंच असेल. ते भाव दर्शनीं सांगावयाचे. आतां विस्तार कोठवर ल्याहावा ? सारांश, स्वामीसेवेवरी एकनिष्ठ असल्यास ज्या कामास सेवक पाठवावी त्याची खातरजमा जितकी आपल्यास असेल तितकीच सेवा त्यास सांगावी, सेवा सांगोन त्याची प्रतिष्ठा न राखतां, जें काम सांगावें तें काम दुसरे द्वारें विशेष साधलियास त्यास पूर्वसूचना असावी. म्हणजे त्याचें पाऊल त्याप्रों पडतें. आपले मर्जीनुरूप येथें आमचें पाऊल पडेल. येथें कारस्तानीने राहिलों याजमुळे आपली पत्रें आलीं तीं त्यांनीं आह्मांस दाखविलीं. जरी आह्मांस पेसजीं रवाना केलें ते समईंची आज्ञा होती, त्याप्रमाणें येथें चित्तांत आणून अंतोबास कैद केलें. ते समईं आह्मीं येथें आग्रह करितों तरी आज हीं आपलीं पत्रें येतीं ह्मणजे आमचीं घोडीं घेऊन आपल्याकडे रवाना करिते. परंतु सेवक आपल्या हाताखालील, याजमुळें चार संधानें राखोन आहों. आपण संधान केलें त्याजशिवाय दुसरे तरेचें छ २५ रजबीं लिहून पाठविलें आहे. तें यांतील नव्हे. प्रगट होऊ नये. हेच विनंती. पत्र श्रीमंत तात्यांस एकांती दाखवावे. यांत आळस नसावा. माझी शपथ असे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.