मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २१५

श्री
१७०१ श्रावण शुद्ध ११

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांस:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवतX विनंती येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यांस आजपर्यंत सर्वप्रकारें येख्तयार मारनिल्हेवर ठेऊन चाललों. इकडे आह्मीं मसलतशीर असेंही असतां दरबारची पुरवणी करीत गेलों. आजपर्यंत दरबारचा गुंता उरकावा व राजश्री बाळाजी नाईक याचे देण्याची तोड निघावी. याप्रमाणें येथून पुरावा केला. ऐसें असतां, दरबारचा व नाइकाचे देण्याचा पेंच तसाच राहिला. यांचें येणें येथें न जालें. यामुळें दरबारचा जाबसाल समजल्यांत न आला. गुदस्ता तिकडोन आह्मांकडे आले त्यास, आह्मांस न भेटतां माघारे गेले, तो दुसाणीयास जाऊन बसून राहिले. दरबारीहि गेले नाहीं. दरबारचा शोध त्याशिवाय मनास न आणावा, तरी हे पहिलेपासून बखेडे. खोर, आह्मीं मसलतसीर. घरांतील खुळें नानाप्रकारचीं. फौजेचे पेंच, चहूंकडे बखेडे. त्याअर्थी कांहींच मनास न आणितां चालविलें. पुढें पाहतां, कोण्हे एक गोष्टीनें परिणाम दिसोन न आला. यामुळें मारनिलेचा बंदोबस्त करणें प्राप्त जाला. ये विसीचें सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करितील. तें ध्यानांत आणून, बंदोबस्त करून दिला पाहिजे. सर्व भरवसा आपला आहे. रा छ ९ माहे शाबान. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती. मोर्तबसुद,
शिक्का मागें दिल्या प्रमाणें,

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries