मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २१७

श्री
१७०१ श्रावण वद्य ५

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर दंडवत विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान दोन तीन पत्रीं आपणांस लिहिलें आहे. त्यावरून ध्यानास आलें असेल. सरकारी वोढगस्त जाली. सरकार ऐवजाची निकड. याचा फडशा व्हावा. अर्थी सर्व प्रकारें वोढ सोसून ऐवजाचा पुरावा करीत गेलों. ऐसें असतां राजश्री अंताजी नागेश यांणीं सरकार व सावकार सचोटी राखिली नाही. हें मनास आणावें तरी आह्मी मसलतसीर आणि घरांतील नाना प्रकारचे पेंच. प्रसंग चहूंकडून विस्कलित, मारनिले गुदस्तां आह्मांकडे यावयासी आले. ते न भेटतां माघारें गेले. ते दुसाणीयास जाऊन राहिले. दरबारींही न गेले. प्रस्तुत आल्यावर मारनिले यांस सांगितलें कीं, दौलतीचा व दरबारचा बंदोबस्त करणे व मागें कारभार येख्तीयारीनें केला तो समजोन द्यावा. तें पुसल्यास ठिकाण नाहीं. ऐसें पक्केंपणें दृष्टीस आल्यावर मारनिले यांचा बंदोबस्त करणें प्राप्त आला. पुढें पाहतां, सरकार व सावकार व दौलतीचा पेंच भारी. येविसींची पैरवी होऊन मागील पुढील आमचे अर्थ आपणांस समजलेच पाहिजेत, ह्मणोन राजश्री बाळाजी नाईक भिडे यांजकडे राजश्री बाळाजी अनंत पा आहेत. हे सविस्तर मजकूर नाइकांस निवेदन करतील. तें ध्यानास आणून आपल्या जवळ नाईक बोलतील त्याप्रमाणें बंदोबस्त करून द्यावा. दौलत पेंचांत आली. मुलुखांत जीव राहिला नाहीं. हमेशा फौजेचा हंगाम. सर्व आपल्या ध्यानांत आहे. त्यास सरकार व सावकार यांचे पेंच उलगडून दौलतीची स्थिति राहे तें करावें. रा छ १९ माहे शाबान, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती. मोर्तबसुद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries