Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २१४.
श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ६
श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-
पोष्य बाळाजी महादेव सा नमस्कार विनंति. येथील कुशल ता छ ४ साबान मुकाम बडोदें यथास्थित असे विशेष. येथून राजश्री बापूजीपंत यांनी आपल्यास पत्र लिा आहे. त्याजवरून सविस्तर समजेल व आह्मीं आपल्या लाखोटियांत श्रीमंत राजश्री तात्यांस पत्रें लिहिलीं आहेत तीं आपण पाहून एकांती तात्यांस द्यावीं. सर्व बंदोबस्त येथील आपल्याकडे आहे. आह्मीं ल्याहावें असें नाहीं. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असों दीजे हे विनंती.