Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २१३.
श्री.
(नक्कल) १७०१ श्रावण शुद्ध ४
राजश्री गोंदबा स्वामीचे सेवेसीं:-
विनंती उपरी, तुह्मी श्रीमंत राजश्री नानास व राजश्री बाळाजी नाईक नानांस पत्रें पार तें पाहून वर्तमान कळलें. लिहिल्याप्रमाणें सरकारचे ऐवजाचा निकाल पडल्यास सारी प्रमाणिकता आहे. नाईक पुष्कळ खातरजमा करितात. परंतु, श्रीमंताचे प्रत्ययास आले पाहिजे की नको ? येविंशीची काळजी धरून सरकारचा निकाल लवकर पडेसें करावें. सविस्तर नाईकाचे लिहिल्यावरून कळेल. बंधूविशीं काळजी न करावी. तजविजेनें आणऊ. शिलेदाराचा मजकूर कसकसा आहे तो लिहून पाठवावा. रा छ २ साबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.
रा गिती भाद्रपद शुद्ध * २ रविवार.