Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २१२.

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४.
पो मिती श्रावण वद्य २ रविवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ कृतानेक सा नमस्कार विनंती येथील कुशल ता। छ २ माहे शाबान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपणाकडे पेशजी भास्करपंतास पाठविले. त्या पत्रांची उत्तरे आपण आषाढ शुद्ध २ पाठविली व हालीं शुद्ध ३ आलीं. त्यास, पहिलीं पत्रें आशाढ वद्य १३ चीं साहा दिवसांचे वाईद्याचीं तीं पावलीं नाहींत. द्वितीयेचे पत्राचीं उत्तरें पाटविलीं तीं पावलींच असतील. त्यावरून कळलें असेल. राजश्री अंतोबा बाबांचा मजकूर तेथून भास्करपंताचे पत्रीं लिा कीं, तूर्त जलदी न करावी. दुसाण्याकडील बंदोबस्त जालियावरी उपरांत करणें ते करावें. आमचें लक्ष त्यांचे ठाईं दुसरें नव्हतें. परंतु यजमानाचें त्याचें दिवसें दिवस वांकडें पडत चाललें, आण आपण पत्रें साहा राजांचे मुदतीचीं पाठविलीं तीं पत्रें आह्मांस न पावली. व कासिदाचें ठिकाण नाहीं. तीं पत्रें त्यांस सांपडली. कशावरून ह्मणावें ? तरी बापूजी नरसी यांजपाशीं आपले पत्रांतील मजकूर बोलले. ते मशारनिलेनीं आजपर्यंत आम्हांशीं बोलले नव्हते. तें प्रस्तुत सविस्तर सांगितलें. व त्या गृहस्थाची चेर्या एक प्रकारची दिसून आली. येथील संशयाचा प्रकार कांहींच घडल्यांत नव्हता, आपलीं पत्रें आलीं त्याचें ठिकाण नाहीं. यांचा प्रकार निघोन जावयाचा यजमानास समजला. तेव्हां यजमानानें बंदोबस्त केला. दुसरें, राजश्री बापूजीपंताशी बोलून त्याचें उत्तर पाठवावें, ह्मणजे सरकारचीं पत्रें पाठवितों, दरबारचा बंदोबस्त केला आहे, म्हणोन लिहिलें. त्यास, याचीं उत्तरें पेशजीं आपणास लिहिलें होतें कीं, बापूजीपंत मारनिल्हेचे ममतेंत, यामुळें आम्हीं त्यांसीं बोललों नाहीं. उभयपक्षीं परस्परें संशय. परंतु पेसजीं आपली चिठी आली, व हालींचे पत्रीं लिा, यामुळें बापूजीपंताशीं ममतेचें बोलून चिठी दाखविली. याजवर त्यांनीं आह्मांस सांगितलं की, जें आमचें यजमानाचें लक्ष तेंच आमचें, दुसरा विचार नाहीं. ह्मणून यांचे व आमचें बोलणें जालें. ऐवजाचा मजकूर खासगत व सरकारचा जाबसाल. त्यास सरकारचें लक्ष राहून आपली सचोटी राहावी, याअर्थी सर्व प्रकारें येथील वोढ सोसून, ऐवजाचा भरणा करीत गेलों. याचे अर्थ सर्व ध्यानांत असतील व पुढें समजतील. दरबारची तोड निघावी व आपले देण्याचा मार्ग निघाला पाहिजे. त्यास, येथील प्रकार दौलत सर्व प्रकारें वोटीस आली. शिबंदीचे व शिलेदारांचे नित्य तंटे ! अशांतहि दरबारचा व आपले देण्याचा मार्ग काढिला पाहिजे. त्याचे तरतुदींत आहों. परंतु निभाऊन घेणें सर्व आपणाकडे आहे. येथील रड लिहितात, असें आपल्या समजल्यांत येईल. त्यास, परभारें समजलें तें खरें. आह्मीं कांहीं कारभारी नाहीं. दरबारी आपल्याशिवाय दुसरियास जाणत नाहीं. सर्व कारभार आपला व दौलतीचें संरक्षण करणें आपणाकडेसच आहे. आपले आज्ञेशिवाय दुसरा विचार नाहीं. आपली आज्ञा तें प्रमाण. आज्ञा प्रो वर्तणूक घडेल. वरकड सविस्तर राजश्री बापोजी नरसी लिहितील, त्याजवरून कळेल. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.