मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २११

श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फतेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यास, आजपर्यंत सर्व प्रकारें येख्तीयार मारनिलेवर ठेऊन चाललों. इकडे आह्मी मसलतसीर, असेंहि असतां, दरबारची पुरवणी करीत गेलों. आजपर्यंत दरबारचा गुंता उरकावा, व राजश्री बाळाजी नाईकाचे देण्याची तोड निघावी, याप्रों येथून पुरावा केला. असें असतां, दरबारचा व नाईकाचे देण्याचा पेंच तसाच राहिला. यांचे येणें येथें न जालें. यामुळें दरबारचा जाब समजल्यांत न आला. गुदस्तां तिकडून आह्मांकडे आले. त्यास, आह्मांस न भेटतां माघारे गेले. ते दुसाणीयास जाऊन बसले. दरबारींहि न गेले. दरबारचा शोध त्याशिवाय मनास आणावा तरी, हे पाहेलपासून बखेडेखोर. आह्मी मसलतसीर, घरांतील खुळें नानाप्रकाची. फौजेचा पेंच. चहूंकडे बखेडे. त्याअर्थी कांहींच मनास न आणितां चालविलें. पुढें पाहतां कण्हे एक गोष्टीनें परिणाम दिसोन न आला. यामुळें माकनिलेचा बंदोबस्त करणें प्राप्त जालें. येविसीचें सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करतील, तें ध्यानांत आणून, बंदोबस्त करुन दिल्हा पाहिजे. तात्या ! आमचा तुमचा भाऊपणा. त्यापक्षीं तुह्मीं सांगितलें त्याप्रों तेंच लक्ष धरून इतके दिवस काहाडले. पुढें परिणाम सुध दिसों न आला. यास्तव हें करणें प्राप्त हे अनभव आपल्यास आले असतील. सर्व भर्वसा आपला आहे. रा छ २ माहे शाबान बहुत काय लिया ? लोभ कीजे हे विनंती. मोर्तबसुद. शिक्का
(मागे दिल्याप्रमाणें).

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries