Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २१०
श्री.
१७०१ श्रावण शुद्ध ४.
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसी:-
श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहादर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष राजश्री अंताजी नागेश येथें आले. त्यास दरबारचे वगैरे जाबजाल पुसिले. येथून दरबारचे भरण्यास ऐवज दरसाल देत गेलों. तो सरकारांत न पावतां सरकारचा पेंच तसाच राहिला. असेंहि असतां, इतके दिवस चालविले. पुढें आमचे घरांतील पेंच, मारनिल्हेचा पहिलेपासून बखेडेखोर कारभार, या अर्थी याचा बंदोबस्त करणे अला. येविसीचे सविस्तर राजश्री बाळाजी नाईक निवेदन करतील. त्यावरून विदित होईल. या छ २ माहे शोबान, बहुत काय लि. हिणे १ लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.