Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २०९.

श्री.
१७०१ अधिकं श्रावण वद्य १०

राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहाद्दर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान राजश्री दादासाहेव व इंग्रज यांजकडील पेसजीं तिकडून बातमी येत गेली.. त्याप्रमाणें आपणाकडे लेहून पाठविलें. त्यावरून कळलें असेल. सुरत प्रांतीं माहालो. मोहालीं त्यांणीं ठाणीं बसविलीं होतीं. डभईस आपाजी आईतोळे याजला सरंजाम देऊन पाठविलें. थोडाबहुत सामान समागमें घेऊन नर्मदा नदी उतरून झाडेश्वरीं आले, ते माघारे उतरून सुरतेकडे गेले. गाजुदीखान यासीं अमदाबाद व बडोदें महीपार पाठवावें, ऐसें होतें. ते मसलत तूर्त राहिली. सांप्रत्य, बातमी आली कीं, इंग्रजांनी अठाविशींतील कमावीसदार बोलावून घेतले. मसलतीचा मजकूर कळलियांत आला नाहीं, ठरल्यांत आला असेल तो खरा. आह्मीं बाहिर निघावयाचे तरतुदींत आहों. फौजेचा देण्याचा पेंच तीं वर्षांचा पडला आहे. लोकांनीं गवगवा बहुत केला आहे. याची समजोति काढोन निघावयाचें होईल. वरकड बातमी तिकडील येईल तैसी लिहून पाठवू. रा छ २४ माहे रजब, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे विनंती. मोर्तबसुद.