मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २०८.

श्री.
१७०१ अधिक श्रावण वद्य ९

राजश्री पंतप्रधान गोसावी यांसीः-

श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब व इंग्रेज यांजकडील पेशजीं तिकडून बातमी येत गेली त्याप्रमाणें आपणाकडे लेहून पाठविलें, त्यावरून ध्यानास आलें असेल. सुरत प्रांतीं माहालोमाहालीं ठाणी बसऊन कमावीसदार पाठविले होते. डभईस आपाजी आईतोळे यांजबरोबर सरंजाम देऊन रवाना केलें. थोडा बहुत सामान समागमें घेऊन, नर्मदा उतरून, झाडेश्वरीं आले, ते माघारे सुरतेकडे गेले. गाजुदीखान यांजला अमदाबाद बडोदें महीपार पाठवावें, ऐसे होते. ते मसलत तूर्त राहिली. हालीं बातमी आली कीं, इंग्रज यांणीं अठ्ठाविसींतील कमाविसदार बलाऊन घेतले. मसलतीचा मजकूर कळणियांत आला नाहीं. काय ठरलियांत आला असेल तो खरा. आह्मीं बाहिर निघावयाचे तरतुदींत आहों. फौजेच्या देण्याचा पेंच ती वर्षांचा पडला आहे. लोकांनी गवगवा फार केला आहे. याची समजोती काढोन निघावयाचें होईल. सुरतेकडील बातमी जैसी येईल तैसी लिहून पाठऊं. रवाना छ २३ माहे रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries