Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
तेधवां चंपावति नगरी भोजराजा त्याणे चाल केलि ।। उरणा पासोन शाहाबाज प्रगाणा मारित कळव्या कटक आले ।। खबर राया बिंबदेवासि कळली ॥ तेधवां बिंबदेवें देशाला हंकारा केला ।। गावोंगावि पत्रें प्रविष्ट जालिं ।। दळ मिळालें जमा जालें सहस्त्र ८००० ।। कळव्या उतरान युद्ध थोर जालें ।। संवत १२४५।। तेधवां भोजराजा मारिला ।। दळासि मोड जाली ॥ तेधवां भोजरायाचा प्रधान साउमा जाला ॥ तें देखोन सिंधा शेषवंशि केशवराव उठावला ।। युद्धासि दोघे प्रवर्तले ॥ युद्ध थोर जालें । मग प्रधान मारिला ।। मग रायाचा पाळकपुत्र उठिला । त्या वर हंबिरराव मरोळचा देसाये ।। उठोन युद्ध जालें ।। हंबिरराव भोजाचा पाळकपुत्र मारिला । उरलें कटक पळोन गेलें ।। मग राजा मासवदा तळ्यावर आला ।। तेथें देसायाला वृती दिधल्या ।। तेधवां शेषवंशि केशवराव नांवाजिला ।। पदक गळ्याचे दिधले आणि पद चाघरि पावला ।। या रिती केशवराव चोधरि जाला ।। या उपरांत देवनरचे पाईके नामुस केला ।। म्हणोन पद ठाकुर पावला ।। मरोळचा देसाये थोर झुंजला म्हणोन काहाळा दोन श्रृति ॥ या उपरांत नाईकराव थोर युद्धी म्हणोन वाद्ये विराणे आणि वीरगांठ सावखेडकर पावले ।। आणि रघुनाथपंत थोर झुंजला ।। म्हणोन निशाण आणि सरदेशकि पावले ।। उतनाचे बारा राउत पडले त्याचे कुळास पद राउत जालें ।। कांधवळिचे १० पाईक पडले म्हणोन उरले कुळास पद चवघले जाले ॥ च्यार मान च्यार टिळे हातकडि पावले ।। साहारकर हातकडि वले ।। कोडिवटिकर कुशळ जाणोन शाहाने हात-सांकळ्या घातले ॥ देवनरकर जुनाई झुंजार म्हणोन सरनाईकी-पद पावले ।। चेभुरकर ठाकुरपद पावले ।। उतन गांहारीस मोहोरिसिंग नरसापुरकर विरगांठ ।। यैसें पदें हे देणे या बिंबदेवाचें ॥ पदे पानपटिं टिळे देवोन देसाय गावोगाविं गेला ।। राजा माहिमास आपुले कुटुंबि गेला ।। तेथे राहिला संवत्सर ९ ।। मग पोटि पुत्र जाला ॥ धर्म बहुत केला ।। या उपरांत राजा बिंब प्रमादला ॥ राजाची राणी माई ॥ पुत्र वरुषा ५ नावं केशवदेव ।। या उपरांत कामाईचा अभिळाष प्रधानें करों आदरिला ।। तेधवां कामाई आपले मनि खोंचली ।। जर यासिं कैसें करावें ।। तेधवां माहिमाचा आपला अधिकारि बोलाविला ।। त्यासि वृत्तांत सांगितला ।। जरि प्रधान दुष्ट बुद्धी त्यास कैसा येत्न करावा ।। हरद पुरो अधिकारि बोलिला ॥ जर तुं आमचि माता ।। तुज पाहे ऐसा कोण आहे ॥ मग दिघिपाळिचे राउतासिं स्वज्ञा केलि देश मिळविला ।। वाडिया दाहा मध्यें रिवार मेळावा मिळाला॥ खुशालि केलि ।। कुसुंबा भांग प्याले ॥ सूर्यअस्त होतां च माहाल प्रधानाचा वेढिला । तेथें युद्ध जालें ।। पाहाल्या पाहाल्या प्रधान मारिला ।। सीर घेवोन कामाई जवळ गेलें ।। राण खुस्याल जाली ।। हरद पुरो आधिकारि आळंगिला ।। देसला नावाजिला ॥ मग देसायाला वृति दिधल्या ।। दीर्घिपाळिचे राउताला वृति वाडिया दाहा बकसिस ॥ प्रथम मान टिळा विडा अधिकारि यांस ।। सर्वेपणाचि प्रौढि तयाला ।। मग अधिकारियान देसायाला हंकारा केला।। मरोळकर मालाडकरांला येकसरकर पोई सरकर उत्तनकर सिंधे ईत्यादिकं सर्व देसाय मेळविले ॥ आणि पळसवलिकर ब्राम्हण राजगुरु पाहाडकर वनेवाळकर समस्त ब्राम्हण बोलावोन ।। केशवदेवासि अभिषेक केला ।। राजासेक्के गळा घातले ।। मग केशवदेवें कामाईस मिळोन देसायांला वाणे दिधलीं ।। मरोळकर माधवजि देसले त्यासि वृत ९ स्यां फद्यांची ।। त्या खालते चौघले त्यांसि फद्या ५ स्यां पाच ।। त्या खालते तारे यांस फद्या ४ स्यांचि ॥ त्या खालते साहाणे फद्या ३ ।। तैसे च मालाडखापणे देसला कमाजिराव ॥ त्यास हि वृत्त फद्या १० ॥ त्या खालते चवघले त्यासि फद्या स्यां ६ ।। ह्मातारेयांला फद्या स्यांचि ।। साहाणें यांला फद्यां ३ ॥ येकसरकर बोरवळि तेथिचा पाईक पामराउत तयाला वृत फद्या ९ ॥ येरगळकर सिंधा त्यासिं उत्तनजुहुचे पाटेलकी बकसिस वृती ५।। ठाणेकरांला वृति बकसिस ।। चेंदणि उतळश्वरकराला टेभ बकसिस ।। सिंधा शेषवंशि हरबा राउत आणि पाटेल दोघे मिळोन वृत टेंभ बकसिस ।। हें देणे राया केशवदेवाचें ॥ मग केशवदेवें ठाण्यासिं राज्य केले वरुषें १२ ।। तेधवा धारेसिं भोज या जवळ गेला ॥ राया केशवदेवाची पदें वाखाणिली ॥ पितामोहो यैसि गद्यपद्य म्हणता जाला ।। तेधवा राजा भोज कोपला ।। कालिचें पोर ऐसा अभिमान धरिला ॥ दळवै बोलाविला ।। आज्ञा दिधली जर सेना सिद्ध करावी ।। हल्ला ठाणे कोकणि ह्मणोन ।। दळ सिद्ध जालें ।। मुहिम केली ।। थेट कळव्यास आले ।। परदळ देखतां हाहाकार जाला ॥ येक केशवदेवा प्रति सांगो आले ॥ जर कटक भोजरायाचे आलें ।। देसायांला हंकारा केला ।। देसाय देसाय देस मिळाला ।। सिंध्याचा जमाव थोर जाला ।। नगा-या घाव घातला ॥ करणे बांके सिंगे डफ काहाळां विराणी वाजली ।। पाईकापाईक जालि ।। कळव्या युद्ध थोर जालें ।। तेधवां देवनरेचे विनायक ह्मातारे याणे राया भोजाचें छत्रिची खिळ विंधोन छत्रि पाडिली ।। दुसरे बाणे सीरिचा गाळटोप पाडिला ।। युद्ध थोर जालें ।। राजा भोज अपेसि जाला ।। या नंतर भैसेदुर्गाचा राव त्या भोजासवें आला होता ।। तो हि युद्धी मिसळला ॥ त्या वर येकसकर पाईक उठावला ।। तो सिंध्याहि वारिला ।। मज असतां बापुडें म्हातारें युद्धी दबाजा करिताती म्हणोन संभाजी पाटेल शेषवंशि उठावले ।। युध्या लागि प्रवर्तले महामारि पेटले ।। दळ भोजाचें भंगिलें ॥ आणि भैस्यदुर्गाचा राव जीवंत धरिला । मग आपलें दळ आलें ।। केशवदेवासिं भेटलें ॥ बंद हवाले केला ।। या रिती केशवदेव येशवंत जाला ॥ भोजराजा शरण आला । मग केशवदेवें तयासि बहुत मान केला ।। पांच लुगडि सीरपाव दिला ॥ तैसें चि आनंदरावासि पैराविलें ।। तत्समइं भोजरायें भोगाईत ठाण्यासि रचिलें ॥ या उपरांत केशवदेवें सिमल ह्मात-यासिं वाहाते यंत्र आळा दिधली ।।