Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

येकसारची पाखाडि बोखळि तेथिचा पाईक ।। त्यासी विरगांठ दिधली ॥ आणि वृत्त पोमदे राउताला बकसिस ।। आणि सिंध्यासि अफदागीर दिधलें ॥ रायें केशवदेवाही ।। सर्व आपुलें दळ पैराविलें ॥ मग राजा ठाण्या होऊन केझमरिस गेला ।। ठिकाण कान्हेरिस केलें ॥ राजा कान्हेरि राहिला ।। राजा भोज आज्ञा मागोन धारेसि गेला ।। या नंतर येक दिवसिं भोजराजे आंबे केशवदेवासिं धाडिल होते ते मार्गि देवगिरिचे राया जश्वद्यान घेतले ।। वेठे रिते दवडिले ।। ते येवोन राया केशवदेवासि भेटले ।। वृतांत सांगते जाले ॥ आंब्याचा वृतांत ऐकोन केशवदेव कोपला ॥ प्रधान बोलाविला जर यासि येत्न हा चि भाट पाठवावा ।। ततक्षणि रवाना केला ।। जर कींनिमित्य आमची भेट लुटावी ।। भले हो चोरि करावी ॥ बेईजति लोक तुह्मी ॥ ऐसे जावोन भाट बोलिला ।। आईकोन जस्वद्या कोपला ।। त्याणे भाट परता केला ॥ जर माझ्या दुर्गास येवोन नाथ फोडावी ।। या वचना भाट परता जाला ॥ येवोन केशवदेवांसिं भेटला ।। वृतांत सांगितला ।। आईकोन केशवदेव कोपला ॥ देसाला हंकारा केला ॥ आला देस सर्व मेळविला ।। सर्व जमा जाला ।। नगा-या घाव घातला ।। निशाणे उभारिली ॥ सिंधे शेषवंशि आपले निशाणे आले ।। सूर्यवंशि आपले निशाणे आले ।। सोमवंशि आपले निशाणे सन्निध जाले ।। नाईकराव आपले परिवारे साह्ये जाले ॥ दळ हंकारले ॥ भैस्यादुर्गा वरि चालिले ।। वेढा घातला ॥ चौ-यासि दुर्गे पालटिली ।। किल्ला अवगड हाति येत नाहिं ।। ह्मणोन डेरा दुर्गा खालिं घातला ॥ राज्याचा निश्चये ऐसा जर गड घ्यावा ॥ वरषें भरली १२ ।। चिंचवणि खादले ।। त्या चिंचो-याचे वृक्ष जाले ।। त्याच्या चिंचा खादल्या ।। ईतके दिवस राहिले ।। परि गड हातिं येत नाहिं ॥ या नंतर आंधेरिचा ह्मातारा त्याचि वृत देसल्यान काढिली ।। ह्मणोन ता पळोन त्या गडी वरि पाईक राहिला होता ।। त्याणे राजयास पालती दिधली ।। नाथ पडे ऐसें उपकर्म केले ।। घरचा भेदु म्हणोन पालत जाली ।। द्वादश वरुषा उपरांत पाईका पाईक जालि ।। भैस्यागड घेतला ।। राजा जश्वंद्या जिवंत सांपटला ।। शरणांगत म्हणोन रक्षिला ।। आपले ताबि मध्यें ठेविला ।। आणि त्या आंधेरिचे गोजबासि ह्मातारा पद दिधलें ।। वृति तीन बकसिस केल्या ।। कापासे ।। सिवार ।। डोंगरी ।। ऐशा वृति दिधलिया ।। मग सर्व मिळोन नवसारिस आले ।। तेथ राजा मदमस्त गोदराव त्यासिं युद्ध थोर जालें ॥ त्यासि ही हारविलें ।। नवसारि घेतली ।। तेथे आपले सेनेला नावाजिलें ॥ वाणे थोर थोर वांटिलीं ।। सिंधे शेषवशि यांसि तुरे मोत्याच दिधले ।। सिरपाव बहुत वांटिले ।। आणि माहिमकर विनाजि ह्मातारा ॥ त्यास हि वाण दीधलें ।। थोर नावाजिलें ॥ देवनरकर गोपाळजि ह्मातारा तो हि नावाजिला ।। तेथे चि पोईसकर त्यासि काहाळा दोन श्रृति।। साहारकर बळकट ह्मणोन पटे दिधले।। उत्तनकराला मोहोरसिंग ।। गोहारिकराला विरगांठ आणि सर्वेपणाचि प्रोढि ।। येकसारकरांला ।। मोहोरिसिंग तयांला ।। येसांवकराला नावाजिलें ॥ येरगणकर बावनवीर यैसे सर्व आपले परिवारेसि ठाणयांसि आले ।। देसाला आज्ञा दिधली ।। सर्व आपले घरोघर गेले ।। त्या उपरांत राज्य केले संवत्सर ५ ॥ मग अकस्मात राजा केशवदेव यास देवआज्ञा जाली ।। तेधवां तें राज्य करावयास राज्यवंश नाहि ।। म्हणोन प्रधान जनार्दन राजि बैसविला ।। देशे देश मिळाला ॥ तेधवां आपण प्रधान बोलतां जाला ।। जर नवां तपयासि आपण राजा ।। सर्वा हि मान्य ।। माझिया वचनि राहावे ।। वचना खेरीज जो होईल तो दसाखेरिज ।। आणि चवदा माहालांचे दाम आह्मांसि भरावें ॥ जे देतिल नाहि ते मी पाहिन ।। व ज्यासि वृति केशवदेवान दिधल्या आहेत त्या सुखें त्याहि भोगाव्या ।। त्यासि कोणाचि बळात्कारि होईल त्यास स्यास्त आपलें देईन ।। यैसा निर्वाह सांगितला ।। तो सर्वासि मानला ।। पानपटि वांटिली ।। टिळा सर्वांसि जाला ।। सर्व देसचे आपले घरांसिं गेले ॥ तें राज्य जनार्दनें केले संवत्सर ४ ॥ त्या उपरांत घणदिवा होवोन नागरस्या राजा वैश्य ॥ गणेशमंत्र उपाशक ।। गोत्र कपिल ।। कुळदेवत सोमनाथ ।। राजा नागरस्या आपलें दळें दवणे प्रगट जाला ।। संवत १२२८ तत् राजिंद्रच क्रचुडामणौ शालिवान शके ११६ ३ माघमासे शुक्ल पक्ष ७ भौमे ते दिवसिं राजा नागरस्या कोकणि आला ।। सवें पुरोहित देवदत्त यजुर्वेदि मध्यानदिन ।। कुळकर्णिक कायेस्त रखमाजि ।। सरजमातदार गंगाजि नाईक ।। सरसबनीस येशवंतराव ॥ या उपरांत पाईक येवोन ठाण्या प्रगट जालें ।। जनार्दनासि युद्ध जालें ।। तेधवां जिंतिला ॥ मग आपला प्रधान केला ।। राज्य काबिज केलें ।। माहिमा आपण नागरस्या जावांन राजमहालिं राहिला ।। मग सर्व देसचे मेळविले ।। देसाये चवघले चौधरि ह्मातारे साहाणे पाटिल ।। हवालदार ।। माहालदार ॥ हाटबखाल ब्राह्मण सर्व खुमे आपले समुदायें खते कागदें पट घेवोन राजभेटीसि गेले ।। सिरपाव जाले ।। बैसकार सर्वांसी दिधला ।। देसायांसी मुलुक विचारिला ॥ जर हा देश कितिक प्रगाणे माहालें आदाय जमा विचारिला तेधवां सर्व खतें कागदें हिसाब चवदा प्रमाणे चवदा माहाले दोन खापणे ।। चौफेर हिंसाब रायासिं दिधला ।। जमा खजिना १४ लक्ष गबर उपज आहे ।। हिंसाब दिधला तो राया नागरस्यास मानला ।। या नंतर देसलिकीचा पटा केशवदेवाचे सिक्यासी ।। देसला भाई ठाकुर पोईसरकराला उंच ओहाणे भाग ५ ।। कांधवळकराला ओहाणे भाग ४ ।। येकसारकराला ४ खाडिया ४ त्यांचि नावें सेरी १ पाहुडि २ वोवळि ३ वादळी ४ या च्यार खाडिया खते मझरी ॥ या उपर उतनकराला सुकडा नाही ।। यैसि खतें दाखविलिं ।। सिक्का केशवदेवाचा ।।