Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठी धातुकोश
घालव, घालवि १ [ कल् १० क्षेपे कालयति ( हांकून देणें) क् = घ् ), की = घेणें ( क् = घ्) ] हांकून देणें.
-२ [ गर्ब् १ गतौ ] घालवणें, दूर करणें.
-३ [ हन् २ हिंसागत्योः णिच् घातयति ] वजा करणें. उ०-दहांतून पांच घालविले.
धाव [ घात्-घात्यते ] जखमी होणें. ( घाय पहा )
धावट [ घात + वट् १० विभाजने ] किंचित् जखम करणें. इतर रूप-घावटळ.
घायटळ [ घात + डुल् १० मिश्रणे ] किंचित् जखम करणें. ( घावट पहा )
घास १ [ ग्रस् १० ग्रहणे-ग्रासय् ] नुकसान लागणें. उ०-घासून घ्यावें पण हासून घेऊं नये.
-२ [ घृष्, घर्ष् १ संघर्षे ] इतर रूप-घांस
-३ [ घष् कांतिकरणे ] लखलखित करणें.
घांस १ [ घंष् घंषते कांतिकरणे ] लखलखित करणें. उ०-मोत्यें घासणें.
-२ [ घर्ष् १ सङ्घर्षे ] ( घास २ पहा )
-३ [ घृष् १ सङ्घर्षे ] ( घास २ पहा )
घासट १ [ घृष् १ सङ्घर्षे- घृष्टाय ]
-२ [ घृष् १ सङ्घर्षे-घृष्ट ( ना. )]
घाळ १ [ गहृर (ना.) गहृरयति ] कोरून छिद्र मोठें करणें.
-२ [हृल् १ चलने हृा-हल् ] मार्ग चुकणें.
घिरट १ [ घरट्ट ( ना. )] ( घरट १ पहा )
-२ [ घृष्टि ]
घिंरट [ घरट्ट ( ना.)]
धिरड [ घरट्ट ( ना.)] (घरट १ पहा)
घिस १ [ घृष् १ सङ्घर्षे-अभ्यास-घिथृष् ] घासणें.
-२ [ हिस् ७ हिंसायाम् ]
मराठी धातुकोश
घामट [ घर्म ( ना. )] घामणें. ( घाम २ पहा )
घामड [ घर्म ( ना.)] घामणें. ( घाम २ पहा )
घामाड [ घर्म ( ना. )] घामणें. ( घाम २ पहा )
घामाव [ घर्म ( ना. }]घामणें, घाम येणें.(पाम १ पहा)
घामे घर्म [( ना. )] घाम येणें, ( घाम १ पहा )
घामेज १ [ घर्म ( ना.)] ( घाम २ पहा )
-२ [ घर्म-धर्मीयते ] घामाघूम होणें.
घाय [ घात्-घात्यते ] जखम करणें. इतर रूपें-घात, घाव.
घायकूत [ हय् १ गतौ + कुथ् १ हिंसाक्लेशनयोः ] ( हयकूत पहा )
घायताव [ घाति + तापनं ] घाति म्हणजे घाई व तापन म्हणजे ताप देणें, घायताचणें म्हणजे घाई करून ताप देणें, निकड लावणें.
घायबर [ घाति + भ्री ९ भये ] भिऊन जाणें.
घायवट [ घाति + वट् १० विभाजने ] जखमी होणें.
घार [ पृ १० प्रस्त्रवणे घारयति ] शिंपडणें, भिजविणें, व्यापिणें.
घाल १ [ गल् १ स्त्रवणे ( णिच् ) गालय् ] गाळणें.
-२ [ घर् ( णिच् ) १० आच्छादने घारयति ] घालणें-झांकणें. उ० पांघरूण घालणें.
-३ [ घर् १० आच्छादने (णिङ्) घारयति ] धारण करणें.
-४ [ घर् ( णिच् ) १० आच्छादने घारयति ] धारण करणें.
उ०- आंगावर पांघरूण घालणें, डोक्यावर पागोटें घालणें; परंतु डोक्यांत सोटा घालणें (घातयति ).
-५ [ घातय् ( त = ड = ल ) ] हाणणें. उ०- पाठींत सोटा घालणें. डोक्यांत कु-हाड घालणें. घात + ल = घातलें.
-६ [ घृ ३ क्षरणे ( णिच् ) घारयति ] ओतणें. घृतं घारयति = घी घालतो. पानीयं घारयति = पाणी घालतो.
-७ [ ग्रह् ९ उपादाने-ग्राहयति ] घालणें-घातलें.
ग्राहित + ल = घाइतल = घातल
भणित + ल = म्हणितल = म्हंतल ( अशिष्ट ) = म्हंटल किंवा म्हणल ( ते म्हणाले )
सनित + ल = खणितल = खंतल ( अशिष्ट ) = खंटल किंवा खणल.
-८ [ ग्रह् ९ णिच् ) ग्राहय् ] घेवविणें. उ०-वैरं ग्राहयेत् = वैर घालणें.
-९ [ ग्रह् = ग्लह् णिच ग्लाहय् ] ( घल १ पहा )
-१० ( ग्लह् १० ग्रहणे ] टाकणें. उ०-फासा घालणें, उखाणा घालणें.
-११ [ ग्लह् १ ग्रहणे ] धारण करणें. उ०-दागिने घालणें = अलंकारान् ग्लहृति.
-१२ [ ग्लहृ १० ग्रहणे ] लाबणें. उ०-पैज घालणे; शर्यतीत पैसे घालणें.
-१३ [ ग्लहणं ] ( घे ४ पहा )
-१४ [ हन् २ हिंसागत्योः ( णिच् ) घातयति. उ०-दगड डोक्यात घालणें.
मराठी धातुकोश
घाट १ [ आ + घट्ट ( णिच् ) १ चलने घट्यति ] घट्ट करणें, घोटणें. ( आहाट ३ महा )
-२ [ घट् १० ( णिच् ) चलने घटिय् ] चलबिचल होणें.
-३ [ घट् १० चलने घट्टनं ]
-४ [ घट् १० संघाते घाटयति घाटनं ( मेलनं )] घाटणें म्हणजे पळीनें मिळविणें.
-५ [ घट्ट १० चलने] झुणका, तेल इ० घाटणें.
-६ [ घातनं ] छळणें, जाचणें.
घाण [ घ्रा १ गन्धोपादाने ] इतर रूपें-घाणव, घाणाव.
घाणव [ घ्रा १ गन्धोपादाने ] ( घाण पहा )
घाणाव [ घ्रा १ गन्धोपादाने ] ( घाण पहा )
घात [ घात् , घातय ] ( घाय पहा )
घातिल ( ला-ली-लें ) [ घातित + ल]
उ०-अथवा निधान हें प्रगटलें । म्हणौनि खदिरांगार खोले भरिले ।। कां साउली न पांतां घातलें । कुहां सिहें ॥ ज्ञा. ९-१४८
घाप १ [ गृभ् ( णिच् क. )] घेणे.
-२ [ गम्ब् ( णिच् ) गतौ ] घालवणें, सोडणें.
-३ [ ग्रभ् १ उपादाने ग्राभ्यते = घापिजणें, गृभ्यते = घेपे. गृभ्य = घेपणें ] घेणें.
-४ [ ग्रह्-ग्रहापय ( घालणें = प्राहयति )]
ग्रभ् = घेपणें ( घेणें )
ग्राभयति = घापणें ( घालणें )
प्राभ्यते = घापणें ( सांपडणें )
-५ [ ग्रभ्-ग्राभयति ] घालणें.
-६ [ ग्रभ्यते ] सांपडणें.
घापिज [ अभ्- ग्राभ्यते ] ( घाप ३ पहा )
घाबड [ घर्म ( ना. )] घामणें. ( घाम २ पहा )
घाबर [ घाति + भ्री ९ भये ] भिऊन जाणें. इतर रूपें-घाबराव, घाबरावि, घाबरवि
घाबरवि [ घाति + भ्री ९ भये ] ( घाबर पहा )
घाबराव [ घाति + भ्री ९ भये ] "
घाबरावि [ घाति + भ्री ९ भये ] "
घाबाड [ धर्म ( ना. }] घामणें. ( घाम २ पहा)
घाम १ [ घर्म ( ना.)] घाम येणें. इतर रूपें-घामाच, घामेज, घामे.
-२ [ घर्म ( ना. }] घाम येणें. इतर रूपें-घामेज १, घामट, घामड, घामाड, घाबाड, घाबड.
मराठी धातुकोश
घसवट १ [ घर्षपट्टिका ( ना. )] झिझणें, शिजणें.
-२ [ घृष् १ सङघर्षे + घत् १० विभाजने ] चोळवटणें.
-३ [ घृष् १ सङघर्षे + घृत् १ वर्तने ] सराव होणे.
-४ [ घृष् उजळणें + वृत् १ वर्तने] सभ्यतेनें वागणें, कोणेका विषयांत अभ्यस्त होणें.
घसाड [ घृष् १ सङ्घर्षे ] घांसणें, चोळणें.
घसास [ घंष्, घंस् १ दीप्तौ द्वित्व, घंस् घस् = (घसघशित) घसासणें ] अतिशय दिपविणें.
उ०-येर जें क्रियाजात । तें तिस्त्रेयाचे करवत ॥ ऐसें सबाह्य घसासित । तेयाचें गा ॥ ज्ञा. १६-२४२
घळ १ [ घृ १० प्रस्रवणें ] धुपून जाणें (नदीची माती वगैरे)
-२ [ घरणं ( घृ १० प्रस्रवणें )]
-३ [ ग्लह = गल ( गोट्या खेळण्याची ) ( ना.)] गोट्या खेळखेळून गल जशी मोठी होते तसे नाकाचे भोक नथ काढून घालून मोठें होणें.
घळघळ १ [ गल् १ स्त्रवणे यहलुगन्त ]
-२ [ घृ ३ क्षरणे ] मोकळे होणें, सैल होणें.
-३ [ ग्लह् १० ग्रहणे. द्वित्त ] जोरानें फांसे टाकणें. इतर रूप-घळघळाव
घळघळाव [ ग्लह् १० ग्रहणे, द्वित्त ] जोरानें फांसे टाकणें. ( घळघळ ३ पहा )
घांगर [ गागर्ह् ( गर्ह् ) = गागरणें = घांगरणें ] घोटाळणें. इतर रूप-घांघर
घागाव [ घाघष्यते ( घघ् १ हसने }] घोटाळणें.
घांघर [ गागर्ह् ( गर्ह् )] घोटाळणें. ( घांगर पहा )
घांघवस १ [ गवेष् १० मार्गणे, अभ्यास-गंगवेष् ] शोध करणे. ( घांघोस १ पहा )
-२ [ गम् १ गतौ यङ् लुगन्त गंगम् गंगेस् ] पांघवसणे. ( ज्ञानेश्वर )
-३ [ गेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस २ पहा)
-४ [ ग्लेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस ३ पहा)
घांघुस १ [ गवेष् १० मार्गणे ] शोध करणें.(घांघोस २ पहा)
-२ [गेष् १ अन्विच्छायाम् ] शोध करणें. (घांघोस २ पहा)
-३ [ ग्लेषु १ अन्विच्छायाम्] शोध करणें. (घांघोस ३ पहा)
घांघोस १ [ गवेष् १० मार्गणे अभ्यास गंगवेष् ] शोध करणें. इतर रूपें-घांघुस १, घोस ३, घांघवस १
-२ [ गैष् १ ग्लेष् । अन्विच्छायाम् ] शोघ करणें. इतर रूपें-वरील प्रमाणें
मराठी धातुकोश
घरस [ घृष् १ सङ्घर्षे ] घसरणे.
घराव [ गृह्य ( ना. )] माणसाळणें.
घर्घर [घर्घर ( ना.)]
घर्ष [ घृष् १ सङ्घर्षे ] घासणें.
घल १ [ ग्रह = ग्लह् १ ग्रहणे (१ = ल) णिच् ग्लाहय् = घालणे ] इतर रूप-घाल ९.
-२ [ ग्लह् १ ग्रहणे ]
-३ [हन् २ गतिकर्मा ( निरुक्त }] जाणें, निघून जाणें.
उ०-जैसा घरि आपुलां । वानिवसें वन्हि लागला ॥
तो आणिकां हीं पाजलला । जालौनि घली ॥ ज्ञा. १-२५७
घवघव १ [गह् १० निबिड असणें ( द्वित्व )] भरून जाणें. उ-फांद्या पानांनीं घवघवल्या.
-२ [ गह् ( निबिड असणें ) द्वित्व ] दाट होणें.
घसक [ घृष् १ सघर्षे-घर्षक ( ना. )]जोरानें खेंचून घेणें. (घसकावि पहा )
घसकावि [ घृष्-घर्षक ( ना. )] इतर रूप घसक.
घसघस [ घंस् वाहाणें द्वित्त ] वाहणें. उ०-ओढा घसघसतो आहे.
घसट [ घृष्टिः ( ना. )= घसट ] घासणें.
घसर १ [ ग्रस् १० अदने] शब्द खाणें, अस्पष्ट उच्चार करणें, उ०-म्हणतांना घसरतो.
-२ [ ग्रस् १० अदने ] उ०-तो भातावर घसरला = सः भक्तं परिग्रसितवान् .
-३ [ ग्रसनं ( ग्रस् १० अदने) घरसणें = घसरणें ]
-४ [ घस्र ( ना. ) ( घस् १ अदने ) ] अतिशय खाणें उ०—तो लाडवांवर घसरला.
-५ [ घृष् + सृ ( सर् ) घस्सरणें = घसरणें ] गुळगुळीत पृष्ठभागावरून पाय निसटून पडणें.
-६ [ दृष् = घृष ( ह = घ)] अति हर्ष पावणें.
ह ची घ होऊन घसर हा शब्द बनला आहे. मूळ घृष धातूपासून बनला नाहीं. घसरणें म्हणजे पडणें हा शब्द निराळा,
उ०- द्रव्य पाहून तो किंचित् घसरला.
मराठी धातुकोश
घडमोड १ [ घट्+मुट् १० संचूर्णने] बांधणें व नाश करणें.
घडव [ घट् १ चेष्टायाम् ] तयार करणें. ( घड १ पहा )
घडाड [ घट्ट १ चलने-अभ्यास ] नाश होणें.
घडार [ घटाभारयति ] घोंस येणें.
घण [ धन ( हातोडा ) ( ना.}] हातोड्यानें ठोकणें.
घणघण [ घट् १० शब्दार्थे घंटयति ] वाजणें.
घणाव १ [ घन ( ना. )] घन-दृढ होणें.
-२ [ घन ( दाट ) ( ना. )] घट्ट होणें.
-३ [ घन ( हातोडा ) ( ना.)] हातोड्यानें ठोकणें.
घनवट [ घनवृत्ति ( ना. }] भरपूर भरणें.
घपकन् [ घ्रा १ गन्धोपादाने घ्रापय ]
घमघम [ घम्ब् १ गतौ ] पसरणें, वासाप्रमाणें चौहोंकडे पसरणें. ( घुमघुम २ पहा )
घयकूत [ हय् १ गतौ + कुथ् १ हिंसाल्केशनयोः ] ( हयकूत पहा )
घरक [ घुर् ६ भीमार्थशब्दयोः ] ( गरक २ पहा )
घरंगळ [ घृ क्षरणे अभ्यास-घर्घृ ] खाली घसरणें.
घरघर १ [ हृद्ग्रहः ( ना. )] हृदयाची क्रिया बंद पडणें. उ०-त्याला घरघर लागली.
-२ [ घर्घर ( ना, }] घरघर आवाज करणे, उ०-घसा घरघरतो.
घरट १ [ घरट्ट (ना.)] घरटींत दळणें. इतर रूपें-घिरट, घरड १, घिरड.
-२ [ घरट्ट ( ना. }] घरटामध्ये दळणें. इतर रूप-घरड
धरड १ [ घरट्ट ( ना. )] ( घरट १ पहा )
-२ [ घरट्ट ( ना. ) ( जातें ) ] जात्यांत दळणें.
घरडुळ [ गृहढुंडः ( ना. ) ] घराचा झाडा घेणें.
मराठी धातुकोश
घ
घंइवर [ कृप् ( णिच् ) १० दौर्बल्ये ] ( गैव्हर पहा )
घट १ [ घट् १ चेष्टायाम् ] घडणें.
-२ [ घट्ट १० चलने ] घडणें.
-३ [ घट्ट १० चलने ] कमी होणें.
-४ [घट्ट १ चलने ] स्पर्श करणे. उ०—तो मला घटून बसला.
घटव [ घट्ट १० चलने ]
घटळ [ ग्रंथ् १ कौटिल्ये ग्रंथते ] वांकडे होणें.
घटार [ घटभारायते ( ना. )] घोंस येणें.
घडघड १ [ घट् १ चेष्टायाम् घटते, घाटयति, घटयति ] इतर रूप-घडव
-२ [ घट् १ चलने ] स्पर्श होणें. उ०-तो शुद्र मला घडला. घटय् = घाटणें. इतर रूपें-घट, बिघड, सांघड
घडघड १ [ गध् गन्ध् १० अर्दने गन्धयतें + द्वित्व गन्धापयते घडघडविणें-नाश होणें. कर्मणि घडघडणें-नाश होणें.] ( घडघडाव पहा )
-२ [ घट् भाषार्थ : द्विरुक्त ] मोठा आवाज करणे. इतर रूप-घडघडाट.
-३ [ घट् १० चलने ] भांडी कोसळणें ( गडगड २ पहा )
-४ [ घट्ट १ चलने ]
-५ [ घर्घर ( ना.) ] मरण पावणेम.
घडघडाट [ घट् ( द्वि. ) भाषार्थः ] मोठा आवाज करणें. ( घडघड २ पहा )
घडघडाव [ गध् गन्ध् १० अर्दने-गन्धयते, गन्धापयते + दित्व ] इतर रूप-घडघड १
मराठी धातुकोश
गोफाट १ [ गुप् १ गोपने ] इतर रूप-गोफट १
-२ [ गुफ् ६ ग्रंथे ] इतर रूप गोफट ३
-३ [ गुफ ६ ग्रंथे ] ( गुंफट १ पहा )
-४ [ गुंफ ६ ग्रंथे ] ( गुंफट २ पहा )
गोबड [ गोमूत्र ( ना. )] गाईच्या शेणाने माखणे. इतर रूप-गोबाड
गोबाड [ गोमूत्र ( ना.)] ( गोबड पहा )
गोरस [ गोरस (ना.)]
ई १ गोव् [ गुप् १० भाषार्थः । गोपयते ]
गोपा = गोवी (कथा, गोष्ट) । गाथागोवी।
कथा, गोष्ट, कहाणी गोवणें म्हणजे सांगणें.।
गोफ्तन् हा फारसी धातु गुप् चा पर्याय आहे।
गोव १ [ गुप्- गोपयते ]
-२ [ गुफ ] इतर रूप-गोंव २
-३ [ गुंफ ] इतर रूप- गों ३
गोंव १ [ गुंपनं ] इतर रूपें-गोंफ १, गुंफ ३
-२ [ गुफ ] ( गोव २ पहा )
-३ [ गुंफ ]( गोव ३ पहा )
-४ [ गुंफनं ] इतर रूपें-गोंफ २, गुंफ १.
गोस [ गवेष् १० मार्गणे ] हुडकणें. इतर रूपें-गौस, गवेष, गवस १.
उ०-आणि विषयइंद्रियां गोसी । स्वभावें तरि भूतांसि ॥
म्हणौनि येंति सरिसीं । त्यें हीं रूपा ॥ ज्ञा, १४-९२
गोळावि [ कुल् १ संस्त्याने ] जमविणें.
गौरवि [ गौरवः ( ना. }]
गौस [ गवेष् १० मार्गणे ] हुडकणें, ( गोस पहा )
ग्रथ [ ग्रंथ् जुळणें ] जुळणे.
ग्रंथ [ ग्रंथ् बंधने ]
ग्रस [ ग्रस् १० अदने ] गिळणें. ग्रास [ ग्रस् १० अदने ] गिळणें.
मराठी धातुकोश
गोंगाव १ [ डु १ शब्दे ] ( गंगाव पहा )
-२ [ ङुछ् १ शब्दे]
-३ [ ङू ] इतर रूप-गोगव
गोंजर [ गुंजारव ( ना.)] इतर रूप-गोंजार १
गोजार [ गोदारणम् ] ( गोंजार २ पहा )
गोंजार १ [ गुंजारव ( ना. )] ( गोंजर पहा )
-२ [ गोदारणं ] इतर रूप-गोजार.
गोठ [ गोष्ठ् १ संङ्घाते ]
गोठावि [ गोष्ठिः (ना.)] गोठणीवर जनावरें जमविणें.
गोडाव [गुड (ना.)] इतर रूपें-गोडावि, गोडिळ, गोडुळ.
गोडावि [ गुड ( ना. }] ( गोडाव पहा )
गोडिळ [ गुड ( ना. )] ( गोडाव पहा )
गोडुळ [ गुड ( ना. }] ( गोडाव पहा )
गोंद [ गो ( अवयव ) + दो ४ अवखंडने गोदानं ] इतर रूप-गोंध २
गोंध १ [ गुथ् - गुंथ् १ प्रथने ] गुंतागुंत होणे. इतर रूपें-गोंधर, गोंधाव, गोंधव, गोंधवि.
-२ [ गो + दो - गोदानं ] ( गोंद पहा )
गोंधर [ गुथ् - गुंथ् १ ग्रथने ] ( गोध १ पहा )
गोंधव [ गुथ् - गुंथ् १ ग्रथने ] ( गोंध १ पहा )
गोंधवि [ गुथ् -गुंथ १ ग्रथने ] ( गोंध १ पहा )
गोंधळ [ गोधुर्वणं ] इतर रूप-गोंधळवि.
गोंधळवि [ गोधुर्वणं ] ( गोंधळ पहा )
गोंधाव [ गुथ् - गुंथ् १ प्रथने ] ( गोंध १ पहा )
गोप [ गुप् १ गोपने गोपति ] उ०- आतां गुह्य गोपून कसें चालेल ?
गोंफ १ [ गुंपनं ] ( गोंव ४ पहा )
-२ [ गुंफनं ] ( गोंव ४ पहा )
गोफट १ [ गुप् १ गोपने ] ( गोफाट १ पहा )
-२ [ गुफ् ६ ग्रंथे ] ( गुंफट १ पहा )
-३ [ गुफ् ६ ग्रंथे ] ( गोफाट २ पहा )
-४ [ गुंफ् ६ ग्रंथे ] ( गुंफट २ पहा )
गोफण [ गोफणा ( ना.)]
मराठी धातुकोश
गुरंगुट १ [ गुठ् ( द्वित्व ) ]( गुरगट १ पहा )
-२ [ गुंठ् ( द्वित्व )1( गुरगट २ पहा )
गुरगुर १ [ घुरघुरायते घुर् ६ भीमार्थशब्दयोः ] कुत्र्यासारखा शब्द करणें.
-२ [गृ ९ शब्दे { गृ ( द्वित्व ) } ] ओरडणे.
-३ [ गुर् ६ शब्दे ] भीतिदायक शब्द करणें.
-४ [ गुर्गुरायते ] कुत्र्याचा भीषण शब्द करणें. इतर रूपें-गुरक १, गुरकाव १, गुरगुराव.
-५ [ गृ १० विज्ञाने ]
गुरगुराव [ गुर् ६ शब्दे ] ( गुरगुर ४ पहा )
गुरपट [ गुर + पट् १ विदारणे { गुड = गुल = गुर ( वाटोळी गोळी ) }] एकमेकांत अडकणें. ( गुरफट पहा )
गुरपिट [ गुर + पट् ] ( गुरफट पहा )
गुरफट [ गुर + पट् ] एकमेकांत अडकणे. इतर रूपें-गुरफाट, गुरपट, गुरपिट.
गुरफाट [ गुर + पट्] ( गुरफट पहा )
गुरंभळ [ गुड ( गुड = गुल ) + भृ १ भरणे ] आंब्यासारखें गोड होणें.
गुरमळ [ गृ ९ शब्दे + मण् १ शब्दे ( द्विधातुसंयोग )] अस्पष्ट बोलणें.
गुरवळ [ गुर्व १ उद्यमने ] वर उचलून येणें.
गुरळ [ गृ ६ निगरणे-निगरणं भक्षणं ] तोंडांतून लाळ पडणें.
गुलक [गृ ९ शब्दे ] चेष्टेनें, मजेंत हसणें.
गुलकाव [ घुण् ६ भ्रमणे धुणक ( ना. }] इतर रूप-धुलकाव.
गुलप [ घुर्ण् १ भ्रमणे + लप् १ शब्दे ] बोलतांना त्रास होणें. इतर रूप-घुलप, गुलफ २.
गुलफ १ [ गो + लुप् ४ विमोहने ]
-२ [ घुर्ण् + लप् १ शब्दे ] ( गुलप पहा )
गुलव [ गुल ( ना. ) ( गुल = गोळी }] गुल लावणें.
गैव्हर [ कृप् ( णिच् ) १० दौर्बल्ये ]
गोंगर [ घुण् ( अ.}] ( गोंगार पहा )
गोंगार [ घुण ( अ.)] इतर रूप-गर गोंगर
गोगाव १ [ घु १ शब्दे ] ( घोघाव ३ पहा )
-२ [ गु १ अव्यक्ते शब्दे ( द्वि }] गवगवणें. ( गवगव पाहा )