Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(४) यापुढील पायरी म्हणजे अतिथीला स्त्रीनिवेदन न करण्याची. ह्या पायरीचे उत्कृष्ट उदाहरण म्हटले म्हणजे सर्व प्रसिद्ध जमदग्नीचे. जमदग्नीची बायको रेणूका हिने चित्ररथ गंधर्वाकडे नुसते सकामदृष्टीने पाहिले, तेणेकरून कोपाविष्ट होऊन जमदग्नीने आपला मुलगा परशुराम याजकडून तिला ठार केले. मानसिकही व्यभिचार ज्याला खपला नाही, त्या जमदग्नीने अतिथीला स्वस्त्रीसमर्पण कितपत सहन केले असते ते सांगावयाला नकोच. सुदर्शनाच्या कथेत अतिथीला संभोग देणे हे दोघा नवराबायकोंना संमत होते. गौतमाच्या कथेत स्वस्त्रीदान नव-याला पसंत नव्हते, परंतु बायकोला व मुलाला पसंत होते. परशुरामाच्या कथेत बापाला व मुलाला दोघांनाही स्वस्त्रीसमर्पण नापसंत होते, स्वतः स्त्रीला पसंत होते किंवा नाही ते सांगवत नाही.
(५) या पुढील पायरी राम व सीता यांची. रावण अतिथीचा वेश घेऊन सीतेपुढे आला व तिला तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने घेऊन पळाला. अतिथीला स्वशरीर समर्पण करण्याची चाल जर सीतेला मान्य असती, तर रामायणाचा पुढील कथाभाग झालाच नसता. रामाला व लक्ष्मणाला व तत्कालीन तमाम भारतीय समाजाला ही स्त्रीसमर्पणाची चाल बरीच गर्ह्य वाटू लागत चालली होती. तथापि पाणिनिकाली ह्या चालीचा किंचित् अवशेष तुरळक तुरळक राहिलेला होता हे द्वैमित्रि या तद्धितीवरून ताडता येते.