Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

२. यूथावस्थ आर्य समाजात जो अनियंत्रित स्त्री-पुरुष समागम एकेकाळी प्रचलित असे त्याचे रूपांतर कालांतराने कसे कसे होत गेले हे शोधून काढण्याचा प्रांत येथून पुढे लागतो. स्त्री-पुरुष समागमाला नियंत्रण बिलकुल नाही अशा पाशव स्थितीतून अतिप्राचीन आर्य समाजाने कोणकोणती नियंत्रणे ऊर्फ नियमने कसकशा परंपरेने ज्ञानत: अज्ञानतः निर्माण केली या बाबीचा शोध केवळ कल्पनेने करण्याची आवश्यकता नसून भारत के हरिवंश यांतील संभवपर्वस्थ वंशकथांवरून बराच निश्चिमातेने लाविता येण्यास साधने आहेत. आदिपर्वाच्या ६४ व्या अध्यायात व हरिवंशाच्या पहिल्या, दुस-या व तिस-या अध्यायात देव, दानव, गंधर्वाप्सरस, मानव व यक्षराक्षस यांच्या उत्पत्तीची जी माहिती व्यासांनी पुराणातून परंपरेने ऐकिलेली दिली आहे ती पाहता असे दिसून येते की, प्राचीन इतिहासकार व्यास यांना प्राचीन आर्यसमाजविषयक जे काही ज्ञान पूर्वपुराणावरून झालेले होते ते बरेच संकुचित व मर्यादित होते. प्राचीन आर्य समाजात प्रजापतिसंस्था निर्माण झाल्यापासून माहिती हा दंतकथाकार ऊर्फ इतिहासकार देतो. तत्पूर्वीची माहिती याला ज्ञानतः नाही. येथे प्रजापतिसंस्था समाजशास्त्रात कशाला म्हणतात ते सांगणे जरूर आहे. अनियंत्रित स्त्री-पुरुष समागमकाली प्रजा, राज्य, पिता, पुत्र, माता, भगिनी इत्यादी नाती अस्तित्वात नव्हती. अमुक अपत्य अमुक पुरुषाचे असे नक्की म्हणण्यास सोय नव्हती. फक्त अमुक मूल अमुक स्त्रीचे इतकेच म्हणता येण्याची शक्यता होती. ती ही शक्यता त्या काळी तत्कालीन अनियंत्रित समाजाने मर्यादित करून ठेविली होती. जेवढ्या म्हणून स्त्रिया एखाद्या जमावात किंवा कळपात किंवा यूथात असत, तेवढ्या सर्व स्त्रिया कळपात जन्मलेल्या सर्व बालकांच्या माता समजण्याची रूढी असे. कार्तिकेय हा सहा किंवा सात आयांचा मुलगा म्हणून वर्णिलेला आहे व प्रत्येक आईने त्याला एकेक अवयव दिला असे सांगितले आहे. म्हणजे जमावांतील एक विवक्षित स्त्रीच्या पोटी यद्यपि एकादे मूल जन्मले, तत्रापि त्या मुलाचे एकेक अवयव जमावांतील सर्व स्त्रियांच्यापासून होऊन ते मूल सबंद झाले, अशी समजूत यूथावस्थ आर्षसमाजात होती. द्वैमातुर, षाण्मातुर, साप्तमातुर वगैरे शब्द व अर्थ ह्या प्राचीन समजुतीचे दर्शक आहेत. या यूथावस्थकाली कळपातील स्त्रियांना जनि म्हणजे पोरे विणा-या म्हणत, पुरुषांना जन म्हणजे पोरे उत्पादणारे म्हणत व मुलांना जात म्हणजे स्त्रिया व पुरुष यांजपासून झालेले म्हणत. हे तिन्ही शब्द याच अर्थाने ऋग्वेदांत वारंवार आलेले आहेत. अर्वाचीन संस्कृतात मूळ या अर्थी जात शब्द योजिलेला सर्वांच्या परिचयाचा आहेच.