Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

या यूवावस्थेकाली मुलांची नावे त्या त्या कळपाच्या नावावरून पडत. कळपावरून पडलेल्या या नावांना यूथनामे अशी संज्ञा आहे. यूथनामांनाच पुढे किंचित् फरकाने गोत्रनामे ही संज्ञा मिळाली. मूल कोठले असे विचारल्यास ते अमुक अमुक यूथातले ऊर्फ कळपातले असे सांगण्याचा रिवाज असे. समजा की, एखाद्या यूथाचे नाव कदंब असले तर त्यातील सर्व मुलांना कादंब हे यूथनाम मिळे, कादंब म्हणजे कदंबाचा. मराठीत चा प्रत्यय शब्दाच्या शेवटी लावून आपण व्यवहार करतो. प्राचीन काळी मूळ शब्दाच्या आद्य स्वराची वृद्धी करून म्हणजे आद्यस्वरापूर्वी आ हा आगम करून तोच अर्थ प्रदर्शित करीत. कळपांतील सर्व मुलांना यूथनाम एकच असे. त्यावरून मूल अमुक कळपातले एवढाच बोध होई. एक मूल दुस-या मुलापासून निवडून काढण्याला हे यूथनाम उपयोगी पडत नसे. सबब दुसरे एक नाव मुलाचे अन्यव्यक्तिव्यावर्तक ठेवीत. ते नाव बापाच्या म्हणजे पुरुषाच्या नावावरून ठेवीत नसत; कारण की, अमुक मुलाचा अमुकच बाप असा निश्चय सरमिसळ व्यवायामुळे करता येत नसे, परंतु अमुक मूल अमुक स्त्रीच्या पोटी जन्मले हे निश्चित असल्यामुळे आईवरून मुलाला अन्य व्यावर्तक नाव मिळे. जसे ममता या स्त्रीच्या मुलाला मामतेय, विनता या स्त्रीच्या मुलाला वैनतेय इत्यादी. संभवपर्वात व हरिवंशाच्या पहिल्या तीन अध्यायात प्रजापतीच्या संततीचे वर्णन व्यास करीत आहेत खरे, परंतु प्रजापतीच्या संततीची नावे जी व्यासांनी परंपरागत पुराणावरून दिली आहेत, ती सर्वं आयांच्या नावावरून पडलेली नावे आहेत. आयांच्या म्हणजे प्रजापतींच्या स्त्रियांच्या नावावरून पडलेल्या ह्या नावांची एक यादीच देतो.