Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(९) पाशवदशेतून यूथावस्थेत येत असताना पाशवीवृत्तीचे अवशेष वन्य समाजात अनेक ठिकाणी आढळतात. In the Sandwich Islands adultery, incest and formication were common things. (सँडविच बेटात व्यभिचार, जवळच्या नात्यात संबंध आणि निषद्ध संभोग या सामान्य गोष्टी होत्या). ज्याला सुधारलेला समाज आपल्या नातगोताच्या दृष्टीने Adultery incest व formication म्हणतो त्याची प्राचीन आर्ष समाजातील उदाहरणे वर हवी तितकी दिली. आता निराळ्याच एका नीतिभ्रष्टतेची उदाहरणे महाभारतातून देतो. वनपर्वाच्या ११० व्या अध्यायात असे लिहिले आहे की ऋष्यशृंगपिता जो विभांडक ऋषि त्याला मृगीपासून ऋष्यशृंग पुत्र झाला. येथे मृग या शब्दाचा एक अर्थ अनृषि मनुष्यांची एक जात असा होईल. सर्प, नाग, गरुड, वानर ह्या जशा अनृषि मनुष्यांच्या जाती तशीच त्या काली मृग ही एक जात असावी. दुसरा मृग शब्दाचा अर्थ हरीणनामक पशू. पशूपासून ऋष्यशृंगासारखी मानवी प्रजा निष्पन्न होणे अशक्य असल्यामुळे हा दुसरा अर्थ प्रस्तुत उदाहरणात सोडून देणे बरे. आदिपर्वाच्या प्रथमाध्यायात व ११८ व्या अध्यायात पांडुशापवृत्त दिले आहे. त्यात दम ऋषि मृगीशी संग करीत असता पांडुराजाच्या बाणाने विद्ध होऊन मरण पावल्याचे लिहिले आहे.पांडुराजा मृगया करावयास गेला होता व तेथे हरणे मारीत होता. त्यात दम ऋषि एका हरीणीशी रममाण होण्यात गुंतला होता. ते ध्यानात न येऊन पांडूने बाण मारिला व तो दम ऋषीला लागला तेव्हा दम ऋषीने पांडूला हे पापकृत्य केल्याबद्दल दोष देऊन मैथुनकर्मात निमग्न झालेल्या आपणांस प्राणांतिक जखम केल्याबद्दलही दोष दिला. पशूशी मैथुन करण्यात काही विपरीतपणा आहे हे राजाच्या किंवा ऋषीच्या मनातसुद्धा आले नाही. कवीने म्हणजे व्यासांनी दम ऋषीच्या ह्या कृत्यावर असे पांघरूण घातले आहे की दम ऋषीने हरिणीशी संग करण्याच्या वेळी हरणाचे रूप घेतले होते व ती हरणीही दम ऋषीची बायको होती; परंतु ही मखलाशी काढून टाकली म्हणजे खरा प्रकार उघडकीस येतो, आदि पर्वाच्या ६६ व्या अध्यायात वर्णन आहे की अश्वरूप धारण करणारी त्वाष्ट्री ही सूर्याची भार्या होती. म्हणजे घोडीशी पुरुष कर्म करीत असत अशी कल्पना तरी निदान व्यासकाली सर्वत्र वाचल्या जाणा-या ग्रंथात लिहिलेली खपत असे. ह्याहून निःसंदिग्ध असे पशुसंगाचे आर्ष उदाहरण म्हटले म्हणजे अश्वमेधयज्ञातील घोड्यांशी यजमान पत्नीने निजण्याचे. अश्वमेधांतील हे प्रतीकरूप कर्म आर्षलोकांच्या पाशवीवृत्तीतील एका चालीचा अवशेष आहे हे जाणत्यांना सांगावयाला नकोच. अतिप्राचीन आर्षलोकांत स्त्रिया व पुरुष पशूंशी संग करीत व तो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष करीत व त्यांत काही विपरीतपणा त्यांना भासत नसे. या बाबीच्या सिद्धयर्थ ह्याहून जास्त पुरावा नको. सांप्रतकाली कुत्र्यांशी गाढवीशी, शेळ्यांशी व गाईशी संग केल्याचे वृत्त कर्णोपकर्णी महाराष्ट्रात कधी कोठे ऐकू येते. परंतु समाजात व कायद्यात तो अक्षम्य अपराध म्हणून गणिला जातो. प्राचीन आर्षकाली तो अक्षम्य अपराध व गुन्हा समजला जात नसे, एवढाच प्राचीन व अर्वाचीन समाजात भेद.