Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हा हक्क कसा उत्पन्न झाला याचा अंदाज करता येतो. देवसमाज व आर्ष समाज हे दोन प्रातिवेशिक समाज असत. देवसमाज बलिष्ठ पडल्यामुळे त्याने आर्ष समाजाला आपल्या कह्यात आणले आणि आर्षांच्या सर्व चीजवस्तेवर व मालमत्तेवर ताबा मिळविला. आर्षाची मुख्य मालमत्ता म्हणजे त्यांच्या गुलामवजा स्त्रिया. त्यांच्यावरही देवांचा ताबा बसला, आणि तो ताबा इतका प्रखर बसला की स्त्री जन्मली की तिच्यावर कोणातरी देवाचे स्वामित्व चालू होई. देवांच्या ह्या अग्रहक्कातून मुक्त व्हायचे म्हणजे त्यांना आर्ष लोक नुसते हिरवे धान्य नव्हे तर उत्तम भाजलेल्या धान्याच्या लाह्या व साचलेले तूप देत व आपल्या मुली देवांच्या ताब्यातून सोडवून आणीत, हा देवांचा अग्रोपभोगाचा हक्क म्हणजे Medieval feudal युरोपातील Prelibation चा हक्क होय. Prelibation म्हणजे अग्रोपभोगाचा हक्क. This right of Prelibation has been in use in many fiefs and until a very recent epoch, certain lords of the Netherlands of Prussia, and of Germany still claimed, in our own days. In a French:Titledeed of 1507 we read that the Count d'Eu has the right of prelibation in the said place when anyone marries. Even ecclesiastics claimed the right in their quality of feudal lords (Letourneau).
(हा अग्रोपभोगाचा हक्क अनेक सरंजामी वतनात चालू होता. अगदी आधुनिक कालापर्यंत आणि प्रशियाच्या नेदर्लेडमधील आणि जर्मनीतील काही लॉर्ड आजही हा आपला हक्क असल्याचे सांगतात. १५०७ सालच्या फ्रान्समधील एका सनदेत काउंट ड'ल्यू याला त्या भागात होणा-या विवाहांत अग्रोपभोगाचा हक्क असल्याचा उल्लेख आहे. धर्मगुरूसुद्धा सरंजामदार या नात्याने हा हक्क असल्याचा दावा करीत.