Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रिये, तुला वरुणाच्या पाशांतून कायमची मुक्त केली आहे. हे आश्वासन दिल्यावर वराने मोठ्या तो-याने व विजयाने वधूला अपराजित दिशेने सात पावले चालविले. देवांच्या कचाट्यांतून वधू सोडवीत आपण मोठा जय मिळविला हे जाहीर करण्याच्या हेतूने वराने वधूला ईशान्य दिशेकडे नेले, कारण ईशान्य दिशा ही आर्षलोकांना जय मिळाल्याची दिशा होती व एतदर्थ त्यांनी त्या दिशेचे नाव अपराजित असे ठेविले होते. स्त्रियांना अग्रोपभोगाकरिता देवांच्या स्वाधीन करण्याची ही पुरातन आर्ष चाल अवशेषरूपाने सध्या आपणात प्रचलित आहे व ती प्रतीकरूंपाने प्रचलित आहे. पुरातन आर्ष लोकांत ही चाल साक्षात् प्रचलित होती. सबब श्रेष्ठांना, समर्थांना व आपल्याहून बलिष्ठांना स्त्रिया अर्पण करणा-या रानटी टास्मेनियन लोकांच्या पंगतीस पुरातन आर्ष लोकांना बसविण्यास हे एक तिसरे कारण उपलब्ध झाले.