Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

११. आकृति-निर्मिती

ध्वनी, रेघा व हावभाव या तीन साधनांइतकेच जुने एक चौथे साधन प्राथमिक मनुष्याला अनुकरणाने सुचले. ते हे की, पाहिलेल्या वस्तूची हुबेहूब आकृती बनविणे. रेघांचे साधन लांबी व रुंदी या दोन परिमाणांतून कार्य करते. हुबेहूब आकृतीच्या साधनाला लांबी व रुंदी लागून शिवाय आणीक खोलीही लागते. प्रथम प्रथम ह्या आकृती तो लाकडाच्या, मातीच्या किंवा दगडाच्या बनवी. राही त्या कपारीचे किंवा गुहेचे अनुकरण करून दोन उभ्या दगडावर तिसरा एक दगड ठेवणे, किंवा राही त्या झाडावरील माच्याचे अनुकरण करून पाण्यात माचे बांधणे, नदीतील रांजण पाहून त्या सारखे लहान मोठे रांजण व रांजण्या करणे, बेलफळे, नारळ इत्यादींच्या कवट्याप्रमाणे मातीची भांडी करणे, गुहेतील पाण्याच्या थिबकण्याने बनलेल्या स्तंभाप्रमाणे दगडाचे स्तंभ बनविणे, पशुपक्ष्यांच्या मृत्तिकामय, दारुमय किंवा पाषाणमय मूर्ती घडविणे, इत्यादी त्रिपरिमाणक आकृत्या बनवून त्यांची कल्पना इतर माणसांना करून देण्याचा हव्यास प्राथमिक मनुष्याला असे. ह्याचीच परिणती होत होत जमिनीवर व पाण्यावर स्वतःच्या उपयोगाकरता नाना प्रकारची भांडी बनविण्याची कला मनुष्याने निर्माण केली. ही कला परिणत दशेस यावयाला हजारो किंबहुना लाखो वर्षे लागली. हे पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.