Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

९. अक्षर व वर्ण

अक्षरसंस्थानाचा हा असा समाम्नाय म्हणजे परंपरा आहे. (१) सबंध प्रसंगाचे मिश्र चित्र, (२) सुटे चित्र, (३) चित्राचा भाग, (४) सरळ रेघा, (५) वक्र रेषा, (६) शब्ददर्शक रेघा, (७) शब्दावयवदर्शक रेघा, व (८) शेवटी साध्या मूळध्वनीच्या सरळवक्र रेखामय खुणा ऊर्फ मूळाक्षरे, अशी लांब परंपरा आहे. चित्रणे व लिहिणे यांची प्राक्सिद्धी झाल्यावाचून मूळाक्षरांची सिद्धी शक्य नाही. मूळाक्षरांच्या पूर्वी चित्र काढणे व रेषा काढणे या क्रियांचे ज्ञान मनुष्याला अवश्य आहे. अर्थात ज्यांना मूळाक्षरे माहीत आहेत ते लोक स्वतः तरी किंवा ज्यांच्यापासून त्यांनी मूळाक्षरे उसनी घेतली ते लोक लिहिण्याच्या टप्प्यावरून अगोदर गेले असले पाहिजेत. वर उल्लेखिलेल्या आठ पाय-या चढल्याशिवाय मिश्रध्वनीचे मूलध्वनीत पृथक्करण करता येणे संभाव्यसुद्धा नाही, मग शक्य कोठून असेल ? सुलभ व सोईस्कर मूळाक्षरांच्या शोधावर येत असताना व आल्यावर नंतर मूलध्वनीचे पृथक्करण मनुष्याला शक्य झाले. वैदिक आर्यांनी ज्या काली अक्षरांचा शोध केला त्या काली अक्षरांना ते वर्ण या संज्ञेनेही ओळखीत. वर्ण व अक्षर हे दोन शब्द शकपूर्व १००० च्या सुमारास झालेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीत गृहीत धरलेले आहेत. वर्ण म्हणजे रंगाने काढलेली ध्वनीची खूण व अक्षर म्हणजे ध्वनीची न बदलणारी खूण. -हस्वं लघु व दीर्घ च, या दोन सूत्रांत -हस्वं या नपुसकलिंगी रूपांपुढे उच्चार हा पुल्लिंगी शब्द अध्याहृत समजता येत नाही, अक्षर किंवा वर्ण हे दोन नपुंसकलिंगी शब्दच अध्याहरणे भाग पडते. अक्षर व वर्ण ह्यांच्यात भेद असा आहे की लोखंडी शलाकेने फळा पाटी, दगड वगैरे कठीण भूमीवर खोदून जी आकृती निघते तिला अक्षर म्हणत व भूर्जपत्रादि मऊ भूमीवर रंगाने काढलेल्या आकृतीस वर्ण म्हणत. शलाकादी कठीण पदार्थांनी दगडावर रेखाचित्रे व रंगांनी रंगचित्रे काढण्याची कला अत्यंत प्राथमिक मनुष्याला माहीत होती, हे सुप्रसिद्ध आहे. तेव्हा पाणिनिकालीन आर्यांना ह्या लेखनाच्या दोन्ही त-हा माहीत होत्या हे सांगणे नको. इतकेच नव्हे तर रेघांच्या खुणांनी संख्यादर्शक ध्वनी दर्शविण्याची कला ऋग्वेदकालीच माहीत होती, हे पंचकर्ण्य: व अष्टकर्ण्य: ह्या रूपांवरून सर्वमान्य आहे. सबब, अरेमियन लोकांपासून अक्षरे हिंदूंनी उसनी घेतली असावी इत्यादी तर्क सयुक्तिक दिसत नाहीत. उलट अरेमियन लोकांनी आर्यांच्यापासून अक्षरे काढण्याची व अक्षरसमाम्नायाची कला उचलली असावी, असे दिसते.