Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५५ (२) अदादि धातू: ह्न अदादिगणात पाणिनीने एकंदर ७२ धातू घातले आहेत. पैकी यङ् किंवा यङ्लुक् मधून जे धातू अदादिगणात आले आहेत त्यांच्याविषयी प्रत्येकी कमी-जास्त काही असल्यास टिपून ठेवतो.
ब्रू : पूर्ववैदिकभाषेत बोब्रोमि, बोब्रूमि, बोब्रवीमि व बोब्रवामि अशी चार रूपे यङ्लुक् ची असत. त्यातून ब्रव्, ब्रवी व ब्रू ही तीन अंगे पाणिनी सांगतो व ब्रवीमि, ब्रव:, अब्रवम् ही तीन रूपे देतो. एकाच ब्रू धातूची अशी तीन किंवा चार अंगे का ? याचे कारण इतकेच की पूर्ववैदिककाळी चार स्वतंत्र परंतु सगोत्र समाज चार पोटभाषा बोलत. एकीत बोब्रवीमि, दुसरीत बोब्रवामि, तिसरीत बोब्रोमि व चवथीत बोब्रूमि अशी रूपे बोलण्यात येत. पुढे कालांतराने हे चार समाज भारतवर्षात एकवटले व समबल पडल्याकारणाने प्रत्येक समाजाच्या बोलीतील काही ना काही तरी खूण संमिश्र वैदिक व पाणिनीय भाषात राहिली. जो चमत्कार नामशब्दांच्या रूपांचे पृथक्करण करताना आढळला तोच चमत्कार धातुशब्दांच्या रूपांचे पृथक्करण व पूर्वेतिहास पाहाताना अवलोकनात आला. हाच न्याय येथून पुढे सर्वत्र जाणावा.