Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
गुणांहून जास्त पट दाखवाययाची असल्यास, ए च्या हून भरीव जो ऐ स्वर व ओ च्या हून भरीव जो औ स्वर तो उच्चारीत. या ऐ ला व औ ला वैयाकरणांनी पुढे वृद्धी ही संज्ञा दिली. विकारांचे प्राबल्य झाले असता, जास्त घोसदार, भरीव व जाडा आवाज काढण्याचा स्वभाव पशु, पक्षी व माणसे या तिन्हीत दिसून येतो. सांजर समस्थितीत असताना मऊँ असा सौम्य स्वर काढते आणि मदाने क्रोधाने किंवा द्वेषाने जेव्हा विषमस्थितीत ते जनावर जाते तेव्हा म्याँव असा तारस्वर ऊर्फ तरभावदर्शक भरीव, चढता व घोसदार शब्द काढते. सर्प, व्याघ्र, गरुड, गर्दभ, श्वान, बलौवर्द आणि रानटी व सुधारलेली माणसे समस्थितीत जे सौम्य उच्चार काढतात त्याहून विषमस्थितीत जास्त कर्कश किंवा भरीव असे तारस्वर काढतात. रानटी आर्य समस्थितीत सौम्य असा भू धातू योजीत व विषमस्थितीत विकारांचे प्राबल्या व भृषार्थकत्व दाखविणारा बोभो असा द्विरूक्त व गुणित धातु योजीत. या रानटी बोभोह्नबोभवामि नामक गुणित रूपाचा संक्षेप भवामि हे वैदिक रूप आहे. येथे अशी शंका आणता येईल की बोभो ह्न बोभवामि हे रूप जर भृशार्थ दाखविते, तर या भृशार्थक रूपाचा संक्षेप जे भवामि रूप ते भृशार्थ न दाखविता केवळ साधा अर्थ का दाखविते? उत्तर : भृशार्थक क्रियापदे योजिता योजिता अनेक पिढ्या गेल्या व भृषार्थक क्रियापदे रोजच्या बोलण्यात येऊन अतिपरिचयाने त्यातील भृषार्थ विसरला गेला व ती साध्या अर्थाची दर्शक झाली. पुढे भृशार्थक क्रियापदे योजिणारे समाजही नष्ट झाले व त्यांच्या भाषेचे अपभ्रंश बोलणारे नवीन समाज आस्तित्वात आले, या नवीन समाजांना मूळच्या भृशार्थाची स्मृतीही राहिली नाही आणि संक्षिप्त रूपे साध्या अर्थाने ते योजू लागले. त्यामुळे भवामि हे रूप साध्या होण्याचे दर्शक झाले. हा प्रकार केवळ अनुमान कल्पित नाही. खुद्द पाणिनीय भाषेत भ्वादिगणात पूर्ववैदिक भाषेतील यङ् लुक् ची रूपे साध्या अर्थीने योजिलेलीं आढळतात. उदाहरणार्थ पा, घ्रा, स्था हे धातु पाणिनीय काली पिब्, जिघ्र, व तिष्ठ् ही अभ्यस्त रूपे धारण करून भ्षादिगणात प्रतिष्ठितपणे साधी म्हणून मिरवत असलेली आढळतात. आता पिब्, जिघ्र व तिष्ठ् ही रूपे पा, घ्रा व स्था या धातूंपासून निघालेली समजण्यापेक्षा पी, घ्री व स्थि या पूर्ववैदिक धातुपासून अभ्यासाने निघालेली समजणे सुयुक्तिक दिसते. पी , पिप पिब्; घ्रि ह्नजिघ्र; स्थि ह्न तिष्ठ; असा अभ्यास झालेला दिसतो. पापासून पापामि ह्न पापेमि; घ्रापासून जाघ्रामि ह्न जाघ्रेमि; व स्थापासून तास्थामि ह्न तास्थेमि रूपे होतात. सबब, पी, घ्री व स्थि असे पूर्ववैदिक धातू घेणे न्याय्य दिसते. इतकेच की हे पी, घ्री व स्थि धातू वैदिककाली लोप पावत चालले होते व त्यांच्या बदली पा, घ्रा व स्था या धातुरूपांचे राज्य सुरू झाले होते, याकरता पा घ्रा व स्था हे धातू पिब्र, जिघ्र व तिष्ठ् ही रूपे धारण करून भ्यादिगणात प्रविष्ठ होतात,