Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
असे पाणिनीने लिहिले. परंतु, खरा प्रकार वरीलप्रमाणे होता. असो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की खुद्द पाणिनीयकाळी कित्येक अभ्यस्त धातू साधे धातू होऊन बसले होते. तोच प्रकार पाणिनीच्या पूर्वी व वेदकालाच्याही पूर्वी भ्यादिगणातील शेकडो धातूंचा होऊन गेलेला होता. भ्यादिगणान्तर्गत धातूंच्या अन्स्य स्वरांना व उपान्त्य ऱ्हस्व स्वरांना गुण का होतो याचे हे असे कारण आहे. ज्या धातूंचा उपान्त्य स्वर दीर्घ असतो किंवा अ असतो त्यांच्या गुणासंबंधाने बोलावयासच नको. अशा धातूंना पूर्ववैदिक अभ्यस्त धातूंचे संक्षेपही म्हणता येईल किंवा साधे धातूही म्हणता येईल. भ्वादिगणातील कित्येक धातूंचा ऱ्हस्व उपान्त्य स्वर दीर्घ होतो. उदाहरणार्थ, गुह्, चम्, ष्ठिव्, क्लम्, क्रम्, उर्द्ं, कुर्द्, खुर्द, गुर्द्ं, हुर्छ्, स्फुर्छ्, स्फुर्ज, तुर्व्, थुर्व्, दुर्व्, धुर्व्, गुर्व्, मुर्व्, मुछ् इत्यादी हे सर्व धातू पूर्ववैदिकभाषात बोभूतिच्या वर्गांपैकी होते. म्हणजे यांची यङ् लुक् ची रूपे अभ्यासाचा गुण व अभ्यस्ताचा दीर्घ होऊन जोगूह, टेष्ठेव, चाक्लाम्, चाक्राम्, चोकूर्द्, मोमूर्छ् अशी होत असत. या पूर्ववैदिक यङ्लुक् चे अवशेष गृह्, ष्ठीव्, क्काम्, ऊर्द्, मूर्छ इत्यादी धातू आहेत. म्हणजे हेही धातू मुळात यङ्लुक् ऊर्फ अभ्यस्तच आहेत. येथे पूर्वीप्रमाणे असा प्रश्न येतो की जोगूह वगैरे रूपातील गू दीर्घ का? या प्रश्नाला पूर्वीचेच उत्तर देता येते. इ हून ए उच्चार जसा जाडा, उ हून ओ उच्चार जसा जाडा तसाच कोणत्याही ऱ्हस्व स्वराहून त्याचा दीर्घ स्वर उच्चारात जाडा, दीर्घ ऊर्फ जाडा उच्चार करण्यात हेतू हा की, भृणार्थ प्रतीयमान व्हावा. येणेप्रमाणे पूर्ववैदिक भाषात बोभृमि, बोभोमि, बोभवामि व बोभवीमि असे चार सांचे यङ्लुक्चे असत. त्यावरून १) भूमि, गृहे, २) भोमि, ३) भवामि, ४) भवीमि असे संक्षेप झाले. या संक्षेपापैकी गूहे व भवामि हे दोन संक्षेप भ्वादिगणात राहिलेले आढळतात. भ्वादिगणातील दृश् धातूबद्दल पाणिनी पश्य् हा आदेश सांगतो. स्पश् पाहाणे असा धातू, त्याचे यङ् चे रूप पस्पश्य. आरंभीच्या पस् चा लोप होऊन पश्य. सद्बद्दल पाणिनी सीद् आदेश सांगतो. पूर्ववैदिकभाषेत सीद् असा धातू असे. त्याचे यङ्लुक् चे रूप सेसीद्. से चा लोप होऊन सौद्. पूर्ववैदिक भाषेत शौ (सडणे) असा धातू होता, त्याचे यङ् चे रूप शेशौय्. शे चा लोप होऊन शौय् हा शौय् आत्मनेपदी चालतो कारण यङ् ही आत्मनेपदी चालतो ज्याला पाणिनी यज् म्हणतो व जो आत्मनेपदी चालतो म्हणून ङ् हा इत् य ला पाणिनीने लाविला आहे तो यङ् पूर्ववैदिकभाषात परस्मैपदीही चाले. याचे उदाहरण वर पस्पश्य् ह्न पश्यति चे आहे. याची इतर उदाहरणे दिवादिगणात पुढे येणार आहेत. बोभो या रूपात अभ्यस्ताचा फक्त गुण झालेला आहे. पूर्ववैदिकभाषात अभ्यस्ताची वृद्धी होऊन बोभौ असेही रूप होत असे. याचे भ्वादिगणातील ठळक असे उदाहरण म्हणजे मृज् ह्न मार्ज् चे आहे. मामार्ज् असे पूर्ववैदिकभाषात मृज् चे यङ्लुक् चे रूप होत असे. मा चा लोप होऊन मार्ज् रूप पाणिनीय भाषेत आले. पूर्ववैदिकभाषेतून मामार्ज् चा संक्षेप होऊन पाणिनीय भाषेत उतरलेला मार्ज् धातू भ्वादिगणात जसा गणला आहे तसाच अदादिगणातही पाणिनीने घातला आहे. अदादिगणातील धातूंचा विचार करताना, दोन्ही गणात हा धातू गणण्याचे कारण काय ते कळून येईल. पूर्ववैदिक अभ्यस्त धातूंचे संक्षेप जसे भ्वादिगणात आढळतात, तसेच पूर्ववैदिक सनन्त धातूंचेही अवशेष व संक्षेप भ्वादिगणात आहेत. नुसते संक्षेपच आढळतात इतकेच नव्हे, तर सबंध सनन्त रूपच भ्वादिगणात साधे म्हणून प्रविष्ट होऊन बसलेले आढळते. हे आगंतुक सनन्त धातू भ्वादिगणात प्रविष्ट होताना आपला मूळचा इच्छार्थ टाकून देतात. असले हे रूप न बदलता निर्लज्जपणे स्वपक्ष सोडून परपक्षात गेलेले धातू येणेप्रमाणे : १) कित् ह्न चिकित्सति; २) गुप् ह्न जुगुप्सते; ३) तिज् ह्न तितिक्षते; ४) बध् ह्न बीभत्सते; ५) दान् ह्न दीदांसते; ६) मान् ह्न मीमांसते; ७) शान् ह्न शिशांसति यांच्याच जोडीला गम् ह्न गच्छ, यम् ह्न यच्छ् व ऋ ह्न ऋच्छ्, या तिघांना बसवा; इतकेच की हे किंचित वेष पालटून आले आहेत. जिगंसति, यियंसति व अरिरिषति, अशी पूर्ववैदिक सनन्त रूपे होती त्यांचे, स चा छ होऊन व अभ्यासाचा लोप होऊन, गंस = गच्छ, यंस = यच्छ व रिष् = ऋच्छ असे अपभ्रंश वैदिकभाषेत आले. अभ्यस्त धातूंचा अतिपरिचयाने जसा भृशार्थ नष्ट झाला, तसाच अतिपरिचयाने सनन्त धातूंचा इच्छार्थ विस्मृतिपथास गेला. भ्वादिगणात आलेल्या सनन्त धातूचे एक चमत्कारिक रूप आहे, ते दा ह्न यच्छतिचे. हा दानार्थक यच्छति व्यय् धातूच्या पूर्ववैदिक सनन्त रूपापासून निघाला आहे. वि + अय् = व्यय्. (वि) अयियिष् = व्ययियिष्. यच्छ् दाच्या स्थानी यच्छ् चा आदेश का होतो तर दा व व्यय या दोन्ही धातूंचा अर्थ देणे असा आहे. दादाति, दादेति, ददाति, दाति व ददौ या पाच रूपाच्या जोडीला दा चे यच्छति हे पहावे रूप हे असे व्यय धातूपासून आलेलेक आहे. गच्छ्, यच्छ्, ऋच्छ् हे आदेश जसे मुळचे सनन्त आहेत तसेच आणिक अनेक धातूंचे सनन्त आदेश भ्वादिगणात आढळतात. त्यापैकी दिग्दर्शनार्थ कित्येकांची यादीच देतो : १) अशह्नअक्ष्, २) दिश्ह्नदीक्ष, ३) शास्, शिष् ह्न शिक्ष, ४) तञ्च, तच्ह्नतक्ष, ५) त्वच् ह्न त्वक्ष्, ६) रह्ह्नरक्ष्, ७) लष्ह्नलक्ष्, ८) मश्ह्नमक्ष्, ९) मृज्ह्नमृक्ष् म्रक्ष्, १०) वाश्ह्न वाक्ष्, ११) भस्ह्नष्ह्नभक्ष, १२) मिह्ह्न मिक्ष्, १३) वृष्ह्नउक्ष् १४) ऊर्ज्ह्नउक्ष्, १५) पष् ह्न श्ह्नपक्ष् १६) वृह्ह्नवृक्ष्, १७) स्तुह्नस्तुच्, १८) भीह्नभ्यस्, १९) भ्रमह्नभ्रंस्, २०) नीह्न नेष् (वैदिक निनेष्), २१) दिह् ह्न धीक्ष्, २२) धीह्न धिष्, इ. इ. इ.
यङ्लुक् मधून व सनन्त मधून ज्याप्रमाणे भ्वादिगणात शेकडो धातू शिरले आहेत त्याप्रमाणेच नामधातूंतूनही काही धातू या गणात घेतलेले दिसतात. गोपा म्हणजे गाईचे रक्षण करणारा गुराखी.