Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
इतिहासदृष्टीने माग काढीत काढीत शेवटी आपण पाणिनीच्या मतालाच येऊन ठेपलो? मूळ धातू भू धरला म्हणजे अविकरण भाषेत भूमि, भूव: भू : अशी रूपे होत. परंतु पाणिनीय भाषेत भवामि, भवाव:, भवाम:, अशी रूपे होत. येथे प्रश्न असा उभा राहिला की भू चे भव् काय म्हणून होते? निव्वळ होते म्हणून सांगून इतिहासदृष्टीचे समाधान होत नाही, वस्तुत: होणे म्हणजे भूतकाळातून वर्तमानकाळात येणे किंवा कारणातून कार्यात प्रविष्ट होणे. भू चे भव् होण्याला कारण काय? म्हणजे परंपरा काय? म्हणजे इतिहास काय? इतिहास मागे सांगितला तोच. पूर्ववैदिकभाषेत बोभो म्हणून अभ्यस्त धातू असे त्याच्या अभ्यासाचा लोप होऊन भो रूप राहिले, त्याच्या पुढे आमि वगैरे अजादि प्रत्यय येऊन भव् + आमि = भवामि वगैरे रूपे होतात. येथे दुसरी एक शंका येते. बोभोमि यात मि हा हलादि प्रत्यय का व भवामि यात आमि हा अजादि प्रत्यय का? उत्तर : आमि व मि, आव: व व:, असि व सि, असे सर्व प्रत्यय अजादि व हलादि असत, हे पुरुषवाचक सर्वनाम प्रकरणात सांगितलेच आहे. दोन्ही प्रत्यय लागत. बोभोमि असे जसे रूप होई तसेच बोभवामि असेही रूप होई. पैकी बोभवामि चा संक्षेप भवामि. दुसरी एक शंका अशी आहे की, भवामि रूप होताना भू तील ऊ ला गुण का होतो तर भवामि च्या पूर्वजन्मीच्या बोभोमि रूपात भू तील ऊला गुण झालेला होता, असा जसा भवामितील गुणाचे कारण म्हणजे पूर्वेतिहास कळला; तसा बोभोमि या रूपात तरी भूतो ल ऊ ला गुण काय म्हणून होतो? उत्तर : रानटी आर्य भृशार्थ प्रथम पुनरुक्तीने दाखवीत. भू हा धातू भू भू असा दोनदा उच्चारून भृशार्थ दाखवीत. याहून जास्त भृशार्थ दाखवावयाचा असल्यास इ ऐवजी ए व उ ऐवजी जो उच्चारुन भृशतरार्थ दाखवीत. इ स्वरा हून ए स्वर उच्चारात जाडा आहे व उ स्वराहून ओ स्वर उच्चारात जाडा आहे. सबब जाडेपणा, मोठेपणा किंवा अतिशायन म्हणजे भृशार्थ दाखवावयाचा असल्यास इ स्थानी ए उच्चारीत व उ स्थानी ओ उच्चारीत. इ हून ए ची व उ हून ओ ची भरीव पणाच्या बाबीत पट जास्त आहे. सबब पट दाखवावयाची असता इ स्थानी ए व उ स्थानी ओ उच्चारीत. ए उच्चारण्यात व ओ उच्चारण्यात पट दाखविण्याचा मूळ हेतू असल्यामुळे वैयाकरणांनी ए ला व ओ ला गुण म्हणजे पट ही संज्ञा दिली. गुण या शब्दाचा अर्थ संस्कृतात पट असा आहे. तेव्हा पट म्हणजे गुण म्हणजे भृशार्थ दाखवावयाचा असता रानटी आर्य इ स्थाने ए व उ स्थाने ओ उच्चारीत. भू म्हणजे साधे होणे आणि भोभो किंवा बोभो म्हणजे साध्या होण्याहून काहीपटीने जास्त होणे. असा हो बोभोतील गुणस्वारांचा इतिहास आहे.