Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
पुराणगत इतिहासकथन
संस्कृतमधील पुराणे आणि ग्रंथ यांना इंग्रजी राज्यकर्त्यांनी भाकडकथा म्हणून नाव दिले. त्याचा प्रभाव आपल्या येथील अनेक विद्वानांवर अद्याप आहे. पुराणग्रंथातील उल्लेख व कथा अद्भुतमय रंगात सांगितल्याही आहेत; पण त्यामध्ये इतिहाससत्याचे मूळ आहे व त्यावर भ्रामक समजुतींचा डोलारा तत्कालीन लेखकानी आधुनिक शास्त्राच्या अभावी रचला हेही खरे आहे. या डोला-यात इतिहाससत्याचा अंशही नाही ही समजूत आता रद्द ठरली आहे. इजिप्तच्या पिरामिड स्तंभामध्ये अनेक भाकडकथा किंवा पुराणसमजुतींच्या मजकुरामध्ये सत्य इतिहासाचीही गुंफण आहे हे मान्य झाले आहे. तशीच मध्यआशियातील असीरिया बाबिलोनच्या मातीच्या ग्रांथिक विटासंग्रहामध्येही इतिहासाची गुंफण सापडते.
पण संस्कृतपुराणाच्याबद्दल ही स्थिती यायला फार प्रयास पडले; कारण. आमच्या राज्यकर्त्या साहेबानी त्यांना तसे सर्टिफिकेट दिले नव्हते.
पुराणातील अनाडी कल्पना बाजूला सारल्या तर त्यात इतिहास किती तरी सापडतो. आता अनाडी कल्पनांत किंवा भारुडात इतिहास कां दडविला असे कुणी विचारील तर त्याला उत्तर पूर्वकाळातील समजुतींच्या अरण्यात शिरावे लागेल. परमेश्वर हा मोठा गणिती व्यक्ति किंवा शक्ति आहे असे जर मोठमोठे इंग्रज शास्त्रज्ञ १९३० मध्ये जागतिक सायन्स काँग्रेसपुढे म्हणू शकतात तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या अडाण्यानी वेद व पुराणग्रंथांतून समाजशास्त्र व इतिहास सांगताना अडाणी उपरणी किंवा पगड्या घातल्या तर बिचकून जाण्याचे कारण काय ? राजवाडे शास्त्रज्ञ या नात्याने उपरणे, पगडी वगैरे बाजूला सारूनआमचा इतिहासजन्य अनुभव व विश्वास आहे. दुराग्रह नाही.