Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

पाणिनीची अनैतिहासिक दृष्टी

"सर्वनामस्थान, म व पद यांच्या बाबीत मूळ प्रतिपादिका पासून अंगे तयार करण्याकरिता शेकडो ठिकाणी नवीन नवीन सूत्रे रचावी लागली आहेत. ह्या सूत्रांच्या जाळ्यातून वाट काढता काढता नवशिक्या व जूनशिक्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे पंचप्राण कासावीस होतात; इतकेच नव्हे तर ठणठणीत कोरडे होतात. देव शब्दांची देव, देवा, देवे ही अंगे होतात किंवा तस्थिवसू शब्दांची तस्थिवत्, तस्थुष् व तस्थिवांसू ही अंगे होतात या सूत्रावरून विद्यार्थी जाणतो. परंतु आगम कां होतात, आदेश कां होतात, अंगे कां बदलतात हे पाणिनी सांगत नसल्यामुळे, शास्त्राध्ययनापासून मतीला जी प्रगतिशीलता व जो जागतेपणा यावा तो येत नाही, यांचे कारण इतिहासदृष्टीचा पूर्ण अभाव. वैदिक भाषा ही देवांची असून ती अर्थात् अनादि आहे अशी पाणिनीची विचित्र समजूत होती, यात मोठेसे नवल नाही. नवल दुसरेच आहे. वैदिक भाषेपासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एक शब्द किंवा एक ज्ञापक संबंध अष्टाध्यायीत एकही नाही. वैदिक भाषेचा संस्कृत भाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे ही सुद्धा कल्पना पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्रे रचली. तत्रापि वेदात येणारे आर्ष प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखेच शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छंदसि बहुलं म्हणून वेदातील अशुद्ध नव्हता; पण हेंगाड्या रूपासंबंधाने पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखविता उलटा आदर दाखवितो. या इतिहासांधतेमुळे वेदांच्या पाठीमागे जग नव्हते व काल नव्हता इत्यादी प्रगतिविरोधक कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावी कालासंबंधाने तुच्छता वाटू लागली. पूर्ववैदिक अनेक भाषा, वैदिक भाषा, पाणिनीय भाषा, प्राकृत भाषा व मराठी प्रभृती प्राकृतिक भाषा ही चढती वर्धमान श्रेढी आहे ही कल्पना यावयाची ती न येता, ही उतरती क्षीयमान श्रेढी आहे अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन भारून व उदासीन होऊन गेले. इतिहासदृष्टीच्या अभावापासून समाजाचे केवढे घोर नुकसान होते त्याचे पाणिनीय सूत्रे नामांकित उदा - हरण आहे.” (“ संस्कृत भाषेचा उलगडा " १९२० ची प्रत, पान ५३ ).

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास लिहू लागले तेव्हा पाराशराने सत्यवतीशी उघड संभोग केला हे विधान करण्याऐवजी जुन्या लेखकाला लाज वाटून त्याने धुके निर्माण करून त्या प्रकारावर काव्यमय पांघरूण घातले व ते बाजूला सारून खरा प्रकारे शास्त्र-शोधक राजवाड्यांनी सांगितला तर फार झाल्यास अडाण्यानी रागवावे; पण सर्व पंडितांनी, विद्वानांनी राजवाड्यांना आतापर्यंत मारण्याची किंवा अज्ञातात फेकण्याचा प्रयत्न केला त्याला काय म्हणायचे ?