Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१८६]                                        ।। श्री ।।              १४ मे १७६०.

पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि :

विनंति उपरि यमुना पार लवकर उतरावें लागतें. यास्तव तुह्मीं अंतरवेदींतून नावा कुल जमा करून एक जागा कोण्हाचा उपद्रव नावेस न लागे ऐसें ठिकाणीं ठेवणें. खासा स्वारी पुढें आलियावरी आज्ञा होईल. त्या स्थळीं आणायास येतील. +तुमच्या जिल्ह्यांत असतील त्या कुल दक्षणतीरीं आपलें जबरदस्तीखालीं जमा करणें. वरचेवरी बातमी वर्तमान लिहीत जाणें. खासा स्वारी अरूण प्रांतखेची येथें आली. दरमजल नरवरच्या सुमारें ढवलपुरचे घाटें उतरोन गिलच्याचे पारपत्यास जातों. हिंदुपत वगैरे बुंदेले लौकर येत तें करणें. पैका जरूर पेशजी लिहिलेप्रमाणें पाठवणें. या कामास विलंब आळस न करणे. जाणिजे. लिहिले प्रे॥ सारा ऐवज तयार करणें. तूर्त पांच लाख जरूर पुढें ग्वालेरी सुमारें पाठविणें. हिंदुपत वगैरे पत्रें फार दिवस गेलीं. सारे सत्वर पंधरा रोजांत येऊन पावतेसे करणें. सुजाअतदौलाचें उत्तर आह्मांकडे येतों असें आले. परंतु पुर्ता भाव शुद्ध पाहून लौकर येतसें करणें. रोहिल्याकडे तुमची डाक बसलीच आहे. फौज कोणे सरदारांची किती ? रमजान झालियावर उमेद कोणती ? सडे कसे जाले ? बहुत जलद दो रोजाआड आह्मांस बातमी येईसें करणें. जयनगरवाले याचे सरदाराचे प्रस्तुत फारच बिघडले आहे. निष्ठेचे गोडहि लिहितात. एकपक्षीं पुर्ते जाले तर निखालसता करोन आणूं. सर्वांस बुंधेले याचा भरंवसा फार. ते सत्वर येतसें करणें. भुपाल खेचीकरहि येणार. अहीर वगैरे लबाड्या सर्वांनीं मांडल्या. बंदोबस्त करून जाणें. पुढील लौकर जाणियास ठीक पडत नाहीं. कार्याकारण करणें तें करून पुढें जातों. नजीबखान तो अबदालीच आहे. त्याखेरीज वरकड रोहिले फुटतील तर फोडावे. महमदखान बंगस याची निष्ठा तुह्मी फार लिहीत होतां. ते प्रस्तुत जाऊन तेथें मिळाले. तेहि येथील स्नेह राखतात. त्यांणीं व हफीज रहमतखान पहिले रुजू होते त्यांणीं अंतस्थ इकडील आश्वासन घेऊन त्याचा बुद्धिभेद करून माघारें कुच करवावें; आपण निराळें व्हावें. यांत ते वांचून अबदालीनजीबखानाचें पारपत्य होईल. ते निष्ठा राखितात. यास्तव त्यांस सूचना असावी. करतील तर उत्तम. न करतील तर सरदार जाट आह्मीं एक जाहालियावर त्यांस पुर्ते भारी आहों. परिणाम त्यांणीं आपला पहावा. नजीबखान तर मूलच आहे. त्याचें बोलणें प्रमाण नाहीं. बातमी जलद पोहोचवणें. बुंधेले वगैरे फौज ऐवज सत्वर पाठवणें र॥ छ २७ रमजान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.