Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१८८] ।। श्री ।। १९ मे १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें.
+ सुजाअतदौला सर्वप्रकारें आपलेकडे येणार, आपण जलदीनें यावें, ह्मणजे येऊन मिळतील, तिकडे जातच नाहींत, ह्यणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास सुजाअतदौलाचा सर्व प्रकारें दुसरा विचार नाहीं, आणि हल्लीं तुमचे लिहिल्यावरून व त्याचें पत्र आलें त्याजवरून फारच खातरजमा जाहली. आह्मीं मालनास आलों. दरमजल पाहारीवर येऊन पुढें सरदारांस सामील होतों. राजेरजवाडे येतील ते घेऊन येतों. तुह्मीं सुजातदौलाशीं बोलोन सर्व पक्के करून एकपक्षीं करणें. आग्रियाआलिकडे सरदारांची गांठ पडतांच त्यांचेहिं येणें व्हावें हें जरूर व्हावें. हल्लीं त्यांस पाठविलें असें तें देणें. तुह्मींहि लिहिणें. मजबुदी पक्की करणें.
महंमदखान बंगस यास पत्र पाठविलें असे. तें त्याजकडे रवाना करणें. त्यास इतकेंच लिहिलें असे कीं तुह्मीं स्नेहाचे रीतीनें फार चालत आला. पुढें जें उचित तेंच करावें. तुह्मीं त्याशीं कितेक मंत्र भेदपुरःसर उपयोग जाणून बोलावयाचें बोलणें. तें प्रस्तृत ते तिकडील पक्षीच आहेत. उगाच राबता असावा. हाफीद रहमदखान यासहि पत्र लिहिलें आहे. देणें. दोनी पत्रांचे मसुदे पाठविले आहेत. हाफीज रहमतखान बंगस फुटतील तर फोडावे.
प्रस्तुत यमुनेपार अंमल त्याचाच आहे. तुमचीं ठाणीं जीं काय आहेत तीं आहेतच. त्याचा बंदोबस्त करून तुह्मीं सत्वर चमेल खासा स्वारी उतरलियावरी हुजूर येऊन फौज सुद्धां मिळणें. बुंधेले वगैरे कांहीं तुमची फौज चमेलतीरीं हुजूर सामील व्हावी. तुह्मींहि बनेल तरी यावें. अगर सुजादौला तुह्मीं मिळोन दरमजल यावें. तिकडे काम नाहीं. येथें मोठे लढाईस सामील नाही असें न होई तें करणें. तुमची डांक असून रोज खबर येत नाहीं असें कामाचें नाहीं.
बुंधेले वगैरे ग्वालेरीस ठेवावे ह्मणोन तर पाहारीनजीक येतों. तेथून पुढें येतेसमयीं हाहि प्रकार करणें तसा करूं.
ऐवजाचा बोभाटच लिहिला तो खराच आहे. परंतु तूर्त वोढ आहे. बेगमी खर्चाची तुह्मींच तजवीज केली पाहिजे. पेशजीं लिहिलेप्रमाणें करणें. पांच सात सत्वर येऊन पावेतसें करणें.
रवाना छ ३ सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
पैवस्ती छ १० सवाल.