Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१८३] ।। श्री ।। ११ मे १७६०.
राजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे दंडवत विनंति उपरि. अंतर्वेदींत ..... ..........................................................यासी आज्ञा केली. त्यास तृह्मांपाशी श्रीमंताकडून हुजूरातचीं पथकें फौज होती ते उठोनि गेली ह्मणोन तुमचें पत्र आलें. त्यावरून हल्लीं तुह्मांस लिहिलें असे. तर रांगडे, स्वार, प्यादे, नवी शिबंदी, अगत्यागत्य प्रसंगानुरूप लागेल तशी गुजरशीनें ठेवून अंमल कायम करून, सरकार काम करणें. खर्च शिबंदीचा लागेल तो मनास आणून मजूरा दिल्हा जाईल. सु॥ इहिदं सितैन मय्या२७२ अल्लफ. जाणिजे. छ २४ रमजान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
श्री ह्याळकांत चरणीं तत्पर.
खंडोजी सुत मल्हारजी होळकर.
वार