Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१७१]                                        ।। श्री ।।                २ एप्रिल १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:-

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्यांकडून पत्रें येऊन वर्तमान कळलें नाहीं तरी सविस्तर लिहिणें. खासा स्वारी मजलदरमजल त्या प्रांते येत आहे. येका दी रोजी ब-हाणपुरास२५९ दाखल होईल. तेथून पुढें दरकुच येणार. तुह्यांकडे बाकीचा ऐवज फार येणें तो पुढील रसदेचा मिळोन पंचवीस लाखाची तरतूद करून ठेवणें ह्मणोन पेशजी लिहिलें आहे व हल्लीं हे पत्र लिहिलें असे. तरी पंचवीस लाखांची तरतूद सत्वर करून ठेवणें व पांच साहा लाख पुढें आह्मांकडे लौकर रवाना करणें. येविसी विलंब न लावणें. वरकड आपल्या ठाण्याठुण्यांचा बंदोबस्त कसकसा आहे ? तिकडील मंडळीला इकडील लक्षानें कोण आहेत ? कोणाचें राजकारण कसें आहे ? किंवा सारेच तिकडे आहेत ? हें वर्तमान तपशिलवार लिहिणें. तुह्मींहि युक्तिप्रयुक्तीनें राजकारण राखून जे इकडे नसतील ते हाताखाली घालणें. जलद जोडी बराबर सविस्तर लिहीत जाणें +हिंदुपत वगैरे बुंदेले यांणीं दारूगोळी वगेरे सरंजामानसी व फौंजसुद्धां हुजूर चाकरीस यावेंच हेंहि करणें. जाणिजे. छ १५ शाबान, सु॥ सितेन मया व अलफ. तुह्मांकडील बातमी वरचेवर यावी ती येत नाहीं. तर जरूर डाक बसवून वर्तमान पाठवीत जाणें. जाणिजे. छ म।। आह्मी दरमजल मधील२६० वाटेनें येतों. आठा रोजा नर्मदापार होऊं. सुजादौला, पादशाहाजादा, बंगालवाले, सर्व आपलियास अनकूळ होतेसें राजकारण करणें. खबर त्याची व सरदार व अबदाली डाक बसवून आठा रोजा आड पत्र येईसें करणें. ऐवज बाकी फार तुह्मांकडे आहे. जरूर वीस पंचवीस पाठवून देणें. छ १५ साबान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

पे॥ छ १७ रमजान.