Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१७३]                                        ।। श्री ।।                २८ एप्रिल १७६०.

पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:-

विनंति उपरि. सुजाअतदौला मातब्बर फौज आलियावरी खामखा इकडे येईल. अबिदालीकडे जात नाही; ह्मणोन विस्तार लिहिला तो कळला. ऐशियास सुजातदौला याचा व मल्हारबाचा पहिल्यापासून स्नेह आहे. त्यास येथेंहि त्यांणी स्नेहच जोडला आहे. पुढेंहि त्यास हेंच पाहिजे की चकत्याची२६१ पातशाही व हे सर्व अमीर आह्मीं एक होऊन अबदालीस काढून द्यावें. त्यांणी त्यास साफ जाब द्यावा. आह्मीं यांणी एक होऊन ज्या गोष्टीनें त्याजवर वजन पडून त्याचे पुर्ते पारपत्य घडें ते करावे. हें तुह्मीं शहाणिया माणसांबरोबर सांगून पाठवून त्यास सर्व प्रकारे इतबार येई तें करून त्याचा दुसरा विचार न राहतां एक पक्षीं होऊन येत तें करणें. सुजाअतदौलाचें राजकरण एक पक्षीं ठीक करून दाखविणें. हे गोष्ट या समयीं फार उपयोगी आहे. तुह्मी शहाणे, सर्व प्रकारें. त्यांशीं राजकारण राखून आहां. त्याचा हाच प्रकार जलदीनें होऊन यावा हेंच चांगले. तर सविस्तर करणें व लिहिणें. अलीगोहर याजकडीलहि प्रकार लिहिला तो कळला. त्यास याउपरि त्याचीं पत्रें वर्तमान येईल तें लिहीणें. त्यांणींहि यावें सुजाअतदौला ते तिकडून आह्मी इकडून सारे जमा होऊन एक होऊन येतों असे जाहलियावर मग अबदालीनें काय करावयाचें आहे? सर्व चित्तानरूप घडेल. या समयीं सुजाअतदौला यांणीं स्नेहाची वृद्धि करावी हेंच बरें आहे. आह्मांस तर चकतेयाची पातशाही राखणें. यासाठीं अबदालीशीं सलुख करणें नाहीं. आह्मी सरदार एक जाहालियावरी सर्व गोष्टी उत्तमच घडून येतील. या ऐशास यांणींहि सामील होऊन चित्तापासून सोबती व्हावें. ह्मणजे आह्मांस पुर्ता याचा भरंवसा जाहला. मागें बोलत होते तें निदर्शनास आलें. न केलिया आमचा शब्द मात्र राहील आणि आह्मी तो श्रीकृपेनें थोडक्याच दिवसांत पोहचून शत्रूचें निराकरण करितों. सर्व हे प्रकार त्यांसी समंजसपणें बोलोन त्याचा निश्चय करून लेहून पाठविणें. जाणिजे. + मागें सरदारांनीं त्याची स्थापनाच पठाणाचे वेळेस $केली. आतां हिय्या वाढवून नेहमीं आमचे होऊन सोबती लढाईस होतील तर पातशाहातचे बंदोबस्ताचें काम त्याचे हातें घेऊं. दोहीं डगरींवर असल्या आपले घरींच कामाचे. सत्वर बोलून उत्तर भावगर्भ लिहिणें. र।। छ ११ रमजान. हे विनंति.