Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५०] ।। श्री ।। ३ जानुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:-
सेवक गोविंद बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ छ १३ जमादिलावलपर्यंत मुकाम नजीक सोनपथ येथें यथास्थित असे. विशेष. आमचें लौकर त्या प्रांतास येणें होत नाही याकरितां आपण देशास जाऊं ह्मणतात ह्मणून चिरंजीव राजश्री बाबांनी कितेक तपशिलें लिहिलें. त्यास, आह्मीं दाटून तिकडें न यावें ऐसें नाहीं. शुक्रतालाहूनच निघोन यावें तों अबदालीची फौज आली. अकस्मात् अबदालीच येऊन पोहोंचला. त्याजवरून दिवसेंदिवस गुंता पडत गेला. याउपरि राजश्री पाटीलबोवा फौजसुद्धां दिल्लीस जाणार. अबदाली व रोहिले शुक्रतालींच आहेत. आह्मी पाटीलबाबाचा निरोप घेतलाच आहे. दिल्लीपावतों बरोबरीच येऊन. दिल्लीपुढे मजलदरमजल त्या प्रांतास येतों. येविशी संशय आपले चित्तांत एकंदर न आणावा. खामखा जलदीनें येऊन पोचतों. आज२१४ येऊन दिल्लीस दाखल पुढच्या सगळ्या पत्रांची शाई निराळी आहे.) जाले. बुनगे जाटाचे मुलखांत रवाना केले. आपण सडे होऊन यमुनापार शामलीमेरट्यारोखें जातात. आह्मी मथुरेवरून येतों. राजश्री मल्हारजीबावा बळवड्यास२१५ लागले होते. ते बळवडा घेऊन ठाणें बसवून झीलाडेयास आले. दरमजलींनीं येतात. ते व हे एक झालियाउपरि बंदोबस्त उत्तमच होईल. चिंता नाहीं. आह्मी उगेंच येथें काय ह्मणून राहून ? अबदाली अकस्मात् आला. याचे कबिले बुनगेयांत टाकून येतां नये. आतां हेहि खासा बुनगेयांत आले. आह्मांस निरोप दिल्हा. बुनगेहि रवाना केले. दरमजलींनीं येतों. रुमाल२१६ पाठविले नाहीं ह्मणून तुह्मास संदेह आला. तर पहिलें पत्र पावलें असतें तर पाराजीपंत याचीं माणसें गेलीं, त्याजबराबर पाठवितों. ते सिकंदरेयास पावलियावर तुमचें व चिंरजीव बाबाचें पत्र पावलें. तेच रोजीं कुच जाहले. ते तमाम मुलखांत गडबड जाली. माणूस निभावेनासें जालें. कागदाचें काम; रुमाल मार्गी गेले तर कामच नासेल, ह्मणून राहिले. काम विलंबावर घालावें ह्यणून राहिलें नाही. बरें, आह्मी लिहितो ते प्रमाण नसेल. काय निमित्य कीं दिवसगत कामास लाविलियास कांहीं नफा आह्मांस असेल. तर सरकारी कार्य जितकें उरकलें, फडशा झालें तेंच उत्तम आहे. बरें! येथें राजश्री भास्करपंत, दादोपंत आहेत. हे तो सांगतील. आह्मी मथुरेवरून येत आहों. कांहीं सरकारी पथकें ठेवावीं लागलीं. जे राहतील ते ठेऊन. आह्मी दरमजलींनीं येतों. तुह्मीं उतावळी न करणें. आह्मी येथें एकंदर राहत नाहीं. इलाज काय करावा ? अबदाली अकस्मात् आला. यास इलाज काय ? बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.