Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४८]                                        ।। श्री ।।                      २९ डिसेंबर १७५९.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यासः

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. रावरायसिंग व दिवाण मुकुंदसिंग बुंधेले यांसी पेशजी होळकर शिंदे यांणी बुंदेलखण्डची वाटणी केली ते समयी परगणा मोधा दरोबस्ती करार करून दिल्हा होता. त्यास राजे जगतराज याणीं जबरदस्तीनें रायसिंगापासून निमे परगणा घेतला; निमे परगणा यांस दिल्हा आहे. ऐशास, हालीं जगतराज वकील दिमत मजकूर यांणी हुजूर येऊन विनंति केली कीं निमे परगणा आह्मांपासून जगतराज यांणीं घेतला आहे तो सोडऊन देववावा. त्याची नजर लाखरुपये आपण सरकारांत देऊं व निमे परगणा सुटोन येईल त्यापैकीं निमे सरकारांत घ्यावा ह्मणोन त्याजवरून राजश्री कृष्णाजी अनंत यांचे विद्यमानें यांजकडील करार:
नजर परगणा मोधा निमे रायसिंगाकडे चालत नाहीं तो जगतराज व पहाडसिंग, $गुमानसिंग खुमानसिंग याजपासून घेऊन रायसिंगाकडे चालता करून देणें. त्याची नजर करार रुपये.

१००००२  सरकारची नजर.
५०००१  सन इहिदे.
५०००१  सन इसने.
१००००२  

१२०००   कित्ता.

१००००  रामचंद्र गणेश याचे.
२०००  कृष्णराव बल्लाळ याचे.
१२०००  

११२००२

एकलक्ष बाराहजार दोन रुपये करार केले असत. दरोबस्त प॥ सोडऊन सदरहू नजरेचा ऐवजी वसूल घेऊन सरकारांत पावता करून पावल्याचा जाब घेणें. कलम १

परगणे मोधा दीड लाख रुपयांचा आहे. त्यापैकीं निमे पाऊणलक्षांचा रायसिंगाकडे चालत आहे. बाकी निमे परगणा जगतराज व पहाडसिंग, गुमानसिंग यांणीं घेतला आहे. तो तुह्मीं सोडवणें. त्यापैकीं निमे साडेसततीस हजारांची जागा रायसिंग यासीं देऊन बाकी निमे साडेसततीस हजारांची जागा तुह्मीं आपणाकडे घेऊन त्याची कमावीस तुह्मीं करून कच्चाहिशेब सरकारांत देत जाणें. तेथील आकार होईल त्यांपैकीं कारकुनास व शिबंदी खर्च लागेल तो कार्याकारण करून बाकी ऐवज सरकारांत पावता करून पावल्याचे जाब घेत जाणें. तेणेंप्रमाणें मजुरा पडेल. कलम १

येणेंप्रमाणें दीन कलमें करार करून दिल्ही असेत. सदर्हू लिहिल्याप्रमाणें वर्तणुक करणें. जाणिजे. छ ८ जमादिलावल सु॥ सितेनमय्या व अल्लफ बहुत काय लिहिणें. हे विनंति.