Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०३ ] ।। श्री ।। २ आक्टोबर १७५७.
पे।। छ १७ मोहरम रविवार प्रहर दिवस बाकीचा.
श्रीमंत सद्गुणमूर्ती राजश्री रावसाहेबाचे सेवेसी:-
आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक दी।। नारायणराव वकील श्रीमंत स।। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १७ मोहरम प्रात:काळ आपले कृपेकरून कुशल. यानंतर हैदराबादेकडील वर्तमान. मुजफरखान गाडदी याणें गडबड मांडिली आहे. एक ठिकाण गडबड करून घ्यावें ऐसा त्याचा मनोदय. हें वर्तमान मुख्यास येथें आलें. हे पुढें तदबीर काय करितात हें लिहिले जाईल. ईम्रामखान गाडदी याचे देवडीवर गुणाजी नाईक दोन माणसें हरकारे ठेऊन आपण हजर राहत आहे. लौकिक बोलवा आहे कीं गाडदीयाचे पोटामध्यें खोटाई आहे. मुख्यापासून आज पावेतों दुसरी गोष्ट निघाली नाहीं. पुढें जे वर्तमान होईल ते विनंति केली जाईल. पूर्वी पांच सा पत्रें सविस्तर सेवेसी विनंतिपत्रे लिहिली सेवेसी पावलीं असतील; परंतु उत्तर येक सादर न जाले. याकरितां सेवकाचें पत्र सेवेसी कोण्ही पोहचवितो कीं नाहीं हेंहि कळत नाहीं. आतां कृपा करून उत्तर सादर केलें पाहिजे. हे विनंति.