Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
अस्ते दिवसांतच, त्यांचे दुसरी स्त्री जिजाईचे उदरी शालिवाहन शके १५४७ अक्षय संवत्छर प्रथम पुत्र संभाजी राजे जन्मले। त्या मागून हीं क्रमें कडून चौघे पुत्र जाहले; परंतूं वर्धमान दशेस पावले नाहीत । ऐसें अस्तां देवदुर्गचे राज्य करणार निजामशाहाचा सेनापती शाहजी राजासी मत्छर केला । तो अंबरखान् देवगतीस पावला । येथें विजापुरांत अल्लीयदलशाहाचा बाप इभराईमखान तो हीं दैवगतीस पावला । तेव्हां दिल्लेश्वर ऐसा जाहगीर पादशहानें पेसजी आपण दक्षिण प्रांतांत देवदुर्गाचा निजामशाहास हीं व विजापूरच्या अल्लियदल्शाहास हीं, लडाईची प्रसक्ती पळ्ळी होती तेव्हां अल्लियदल्शाहास मोगलाईची फौज देऊन लष्करखानास पाठविला । तेव्हां निजामशाहानें शाहजी राजाच्या बळें कडून अमचे मोगलाईच्या फौजेस मारून काहाडून अपमान केला । आतां त्या निजामशाहाकडें शाहजी राजे ही नाहीत व यादव राजा हीं अगोदरीच निघून गेला । त्याचा सेनापती अंबरखान् दैवगतीस पावल्याकरितां त्याचें बळें ही उणें पळ्ळें । दुसरें, त्या निजामशाहाची चर्या हीं नीट नाहीं । ऐशा समयांत त्याजवरी राजकारण केलिया स्वाधीन होईल ह्मणून तजवीज करून निजामशाहावरी युत्धास सैन्य देऊन दर्याखान् म्हणार सरदारास पाठविले । हे वर्तमान निजामशाहास कळून निजामशाहानी आह्माकडील शाहजी राजे व यादव राजे उभयतां हीं आह्मांकडून गेल्याकरितां ह्मणे पराजय हीं आला; आतां हीं दर्याखानानें चाली केली आहे । आतां सर्व प्रयत्न कडून शाहजी राजे व यादव राजे उभयतांस हीं अंतरंगें कडून संविधान पाठविले । त्या वरून यादव राजे मोगलाचे इलाखेंत होते ते हीं व शाहजी राजे विजापुरांत होते ते हीं उभयता निजामशाहाची मुलुक देवगिरी समीप धारागिरी ह्मणावयाचे स्थलास येऊन पावले। त्या धारागिरी समीप शिवनेरी गड ह्मणून येक स्थळ त्या शिवनेरी गडचा यजमान विश्वासराव याच्या वंशांत जन्मला तो विजय राजा म्हण्णार, त्या शिवनेरी गडचे राज्य करीत होता ।