Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
अैकून अफजल्खान जावळीस राजाचे भेटीस जातेवेळेस ठाणी ठेविल्या गडकिल्ल्यांत येकंदर त्यांची ठाणीं ठेऊन आपलीं ठाणीं मजबूत ठेऊन आपणहीं राजाजवळी जावलीस जाऊन पावला।तदनंतरें शिवाजी राजयानी नेतोजी सेनापतीस बरोबरी घेऊन, अल्लीयदल्शाहाचा मुलुक बांधिला, तो पश्चिम नगर संपगावशसवड हे शाहार किल्लासहीत घेऊन यास अधिकारी होता तो अल्लीयदलशाहाकडील हिलाल्खानास पडाऊ केले; तोही निर्मल मनेकडून राजाचा अंकित झाला; त्यालाही समागम घेऊन शिवाजी राजानी अल्लीयदल्शाहाचा मुलूक व दिल्लींद्र अवरंगजबाचा मुलूक देखील बांधिल्याना व निशा किल्ले दुर्ग गड देखील मायावती, रामपूर, कलधूतिका, जयंतीका, अष्टी, अष्टवट, वेल्लापूर, उंबरगांव, मसूर, करहातोग, गांवें पल्लिका, नेरळ, कननार बटु, मुरण, कोकपूर, करवार, येणेंप्रमणें तमामें राजा बांधून यांतील सरदारांस कित्येकांस कौलावरी सोडिलें; कित्तेकांस मारून टाकिले, कित्तेकास बंदीखानी घालून साथिल्या राज्यास येकंदर मजबूत ठाणी ठेऊन, तदनंतरें नेतोजी सेनापतीस समागम सेना देऊन अल्लीयदल्शहाचा मुलूक व दिल्लींद्र अवरंजबाचें मुलूकहीं बांधणें ह्मणून निरोपून पाठवून अपण पनाळा गड साधावा ह्मणून येऊन पनाळास मोर्चे देऊन गडावरी चाल केली; तेव्हां गडावर्ल्यांनीं अनेक गोळ्यांचा मार व उदंड शीसें ताऊन ओतिले; या प्रकारी बहुत मार केले. । ते कोणतेंही गणना करिनासें शिवाजी राजे गडावरी चढून हल्ला करून किल्लाहीं घेऊन आंतीलेसरदारांस मारून येकून मारिले लोक जातां उरल्यास सोडून देऊन पनाळगड संग्रह करून घेऊन तेथेंच राहिले । यास कांहीं अगोदरीच अल्लीयद्दल्शहानी तजवीज केली जे शिवाजीराजे केवळ शूर प्रस्तुत प्रतापगड जयवल्ली प्रांती आहेत ते पुनें पणाळगड समीपच करितां तिकडें येतील ते पनाळगड फार चांगला आह्माला प्रियकर आस्ती होऊन आहे कदाचित् तो गड