Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्या बाबाजी राजाची स्त्री रेखाउ । त्या उभयापासून दोघे पुत्र जन्मले । त्या पैकीं ज्येष्ठ मालोजी राजे। दुसरे विठोजी राजे ॥ १४ ॥

दुसरे पुत्र विठोजी राजाची धर्मपत्नी आउबाईसाहेब । त्यापासून ज्येष्टकन्या अंबाबाई । त्या उपरी अष्टपुत्र जन्म पावले । पैकीं पहिले संभाजी राजे; दुसरे खेलोजी राजे; तिसरे मालोजी राजे; चवथे परसो राजे; पांचवे नागोजी राजे; साहवे मनोजी राजे; सातवे कंकाजी राजे आठवे त्रिंबकजी राजे । हा बाबाजी राजे यांचे दुसरे पुत्र विठोजी; राजाचा वंश । या उपरि यांचा विस्तार पुढें येईल । आतां बाबाजी राजे यांचे जेष्ठ पुत्र मालोजी राजे यांची ख्याती । त्या मालोजी राजे यानी उमाबाईसाहेब यासी पाणिग्रहण करून घेऊन विहितधर्मेकडून स्वराज्यपरिपालन करीत होते । त्या समई निजाम पादशहा ह्मण्णार देवगिरि दुर्गोत राज्य करीत होता । व ईभराईम बादशहाचा लेक, य लशहा म्हण्णार पादशहा, विजयदुर्गीत राज्य करीत होता । त्या यदलशाहास प्रतिनाम अल्लिशाह म्हणूनहीं प्रख्यात होतें । दैववशात् देवगिरि दुर्गाच्या निजामशहासहीं व विजयदुर्गाचा राजा यदलशहासहीं युत्धप्रसंग पडलें । त्या प्रसक्तींत, बाबाजी राजाचे पुत्र मालोजी राजे परमशूर बहुत युद्धांत जय पावले आहेत जाणून, मालोजी राजास व त्याचे भाउ विठोजीराजासहीं, देवगिरिदुर्गाचा निजामपादशहा साह्यास बलाविला।। त्या उभयतां बंधूंनी सैन्यासह निजामशहाला साहाय होऊन विजयदुर्गचा राजा अल्लीशहा बरोबर युत्ध करून जय पावून निजामपादशहाची संकटे परिहार करून, याचे देवगिरिदुर्गाचे राज्य त्यास देते झाले। तो संतोष पावून, आपुल्या समग्र राज्यांत ही चौथाई जहागीर देऊन मालोजी राजे विठोजी राजे उभयतां बंधूंनी आपल्याकडेंच असावें ह्मणून प्रार्थिलें । तेणें प्रमाणेंच, मालोजी राजांनी आपलें स्वराज्य आपले सचिवाचे स्वाधीन करून आपण उभयतांबंधूनी निजामशहाकडेच वास्तव्य केलें.