Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

द्यावा ह्मणावेंयाची दुराग्रहें कडून निजामशाहापासी खेलोजी राजाची योग्यता व शौर्य प्रस्तूत संभवल्या युत्धांत जय झाला तोहीं खेलोजी राजामुळेंच ह्मणून, असे एकंदर जाणऊन निजामशाहाकडून विठोजी राजाचे पुत्र खेलोजी राजास विशेष मर्यादा करविले । ते शाहजी राजानी ऐकून विमनस्क होऊन सवेंच त्या संगतीचा त्याग करून आपले स्वस्थळ सातारगडास पावले । कित्येक दिवसानंतरें, शाहजी राजे निजामशाहाकडून विमनस्क होऊन आपले स्वस्थळास पावला, विध समग्र अल्लीयदलशाहास कळून शाहजी राजा सारिख्यांस आपलें करावें ह्मणावेंयाचें अपेक्षेनें तदनुसार संविधान केले । त्या संविधानाची बोली प्रशस्त भासल्याकरितां शाहजी राजांनी अंगीकार करून अल्लीयदलशाहाकड जाऊन भेटि व बोलणें झाल्यानंतर आपलें सैन्य व अल्लियदलशाहाचे सैन्य हीं येकवटून येऊन निजामशाहावरी मोहीम् केले, तेव्हां पेसजी अल्लीयदल्शाहासी दिल्लेश्वर जाहगीर पादशाहानी मोगलाईचा कुमक पाठविले होते । तेहीं व यादव राजेहीं या दोनी फौजाहीं आगाऊच निजामशाहासी मिळून शाहाजी राजानीं युत्ध केल्यांत पराजय पाऊन फरारो जाहले । तेहीं व यादव राजे मोगलाचे इलाखेंत राहून गेले । प्रस्तुत शाहजी राजानी अल्लीयदल्शाहाचे सैन्य मात्र आपल्या सैन्याबरोबरी घेऊन निजामशाहावरी युत्धास जाऊन युत्ध केल्या ठांई निजामशाहाचे सैन्य व सेनापति अंबरखान् देखील पराजय पाऊन वाताहत झाले । शाहजी राजे जय पाऊन अल्लीयदल्शाहाकडे आले तेव्हां शाहामजकूरानी फार संतोष पाऊन शाहाजी राजास आपले अर्ध राज्य जाहगीर दिल्हें । तदनंतरें शाहजी राजे अल्लीयदलशाहाचे स्वाधीनेंत न्यायता होते ते मुधेखान प्रभृतीस येकंदर जिंतून स्ववशास जाणून पश्चिमप्रांत केरन्न देश आदिकरून अनेक देशाचे देशाधिपती समग्र अल्लीयदलशाहास तोफा दिइजस करून अल्लीयदल्शाहाच्या खजान्यास बहुत द्रव्य जमा होईजेसें केलें । तदनंतरें शाहजी राजे, विजयदुर्ग ह्मणावेयाचें विजापुरांत