Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तेव्हां मालोजी राजास शाहसरीफ बे अल्ली कलंदर ह्मण्णार एक फकीर सिद्धपुरुष स्नेहित जाहला । त्या शाशरीफ ह्मण्णार फकिराचे ठायांस मालोजी राजांनी जाऊन आपल्यास पुत्रसंतान नाहीं म्हणून सांगितलें । त्यास त्या फकिरानें कांहि वेळ ध्यान करून सवेंच मालोजी राजांस पाहून ह्मणाले जें :-तुह्मांस दोघे पुत्र होताती । ते दोघे महाशूर परमभाग्यवंत हीं होतील । त्यांचा वंशहीं विस्तारकडून होईल । त्यांचे वंशी परंपरेत जाहले पुत्र, समग्रहीं परम भाग्यवंत होऊन असतील । त्या दोघा पुत्रांसहीं, आमचे नांवे ठेवा आणि आह्मीं देतों या वस्तूस मर्यादेंकडून ठेवा । ह्मणून पांच वस्तू दिल्हे । त्याचा तपशील:- नागीण ह्मणोन एक तरवार; पद्मिण ह्मणोन एक तरवार; येकून तरवार। दोनी; व आपला लंगोट येक; व कलदरा येक; व पंजा येक; ऐशे पांच वस्तू दिल्हे । उपरि मालोजी राजास प्रथमपुत्र, शालीवाहन शके १५३१ साधारण संवत्सर, दुसरे शाहाजी राजे जन्मले । तदनंतरे दुसरे पुत्र जन्मले । त्यांस शरफोजी राजे म्हणून नाम ठेविले, ते दुसरे ॥ १५ ॥

तदनंतरे ज्येष्ठपुत्र शाहाजी राजे, पांच वर्षाचे वयारूढ झाले तेव्हां कोल्हापुरचे राजे होते, त्यास व निजामपादशहासहीं, विकल्प पडून, कोल्हापूर्चा राजा व पांच वर्षाचे शाहाजी राजाचे वडील मालोजी राजास युत्धास पाठविले । तेव्हां मालोजी राजे निजामशहाचे प्रेषीत होऊन अपले स्वसैन्य व पादशहाचे सैन्यहीं स्वार वारपरिवार हत्यारासहीत, कोल्हापूरचा राजावरी जाऊन अद्भूत युत्ध करून, बहूत वार शत्रूस पराजयहीं करून तदनंतरे सन्मुख युत्धांत वीर स्वर्ग पावले । उपरि शाहाजी राजास निजामशाहा पादशहानी या शाहाजी राजे शरफोजी राजे उभयतांचे वय लहान, करितां त्यांचे संरक्षणास्तव त्यांचे चुलते विठोजी राजांकडे निरऊन, त्यांचे योग्यतानुसार परिपालन करविलें । तदनंतरे शाहाजी राजे यौवनारूढ जाहल्यावरी मोहते रायाची कन्या उमाबाई साहेबास प्रथम पाणिग्रहण केले । तदनंतरे निजामशाहाचे अनुमतीनें शहाजी राजे अपले स्वराज्यपदास