Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
रुप्पेरी; पिंजराबरी शिफेद फुल बासण; दांडीचे पुढिले बाजूस सिंव्ह; ललाटावरी फुलाचा हार धरिला गोंडा; जडित खुबा, येखादे सोन्याचा खुबा; भरजरी दांडीस दोनि बाजूस मखमली गलेफ । येणें प्रमाणें त्या येकशिवमहाराजानीं बिरुदाचे पालखींत स्वारी करू लागले। या खेरीज, हत्ती घोड्याची वगैरे बिरुदें, प्रसंगानुसार लिहिलीं आहेत । तदनंतरें त्या येकशिवराजाचे उदरीं रामचंद्र राजे जन्मले ॥ ४ ॥
त्या रामचंद्र राजानी न्यायेकडून राज्यपरिपालन करीत असतां, त्यांचे उदरी भीमराज म्हणून राजे जन्मले ॥ ५ ॥
त्या भीमराजानी, विहीतधर्मेकडून प्रजापालन करीत असतां, त्याचे उदरीं दुसरे येकोजी राजे जन्मले ॥ ६ ॥
त्या येकोजीराजानी, आपले स्वबाहूबलपराक्रमेंकडून सातारगड आक्रमिले। तदनंतरें पादशहासी युत्धप्रसक्ती पडल्यामुळे, गडावरीच। वास करून होते । उपरी त्या येकोजीराजाचे उदरी वराहराजे जन्मले ॥ ७ ॥
ते वराहराजे परमशूर, न्यायेकडून राज्यपरिपालन करीत येण्यांत, पंचावन्न हजार स्वार ठेऊन पादशहासी युत्ध करून जिंतून ख्याति केले ॥ उपरि त्यांचे उदरी तिसरे येकोजी राजे जन्मले ॥ ८ ॥
त्या येकोजी राजाचे उदरीं ब्रह्माजी राजे जन्मले ॥ ९ ॥
त्या ब्रम्हाजी राजाची धर्मपत्नी अनसाउ । त्या उभयापासून प्रथमशाहजी राजे जन्मले ॥ १० ॥
त्या शाहाजी राजाची पट्टस्त्री उमाउ । त्या उभयापासून अंबाजी राजे जन्म पावले ॥ ११ ॥
त्या अंबाजी राजाची स्त्री रेणुका आउ । त्या उभयांपासून परसोजी राजे जन्म पावले ॥ १२ ॥
त्या परसोजी राजाची स्त्री उमाउ । त्या उभयापासून बाबाजी राजे जन्म पावले ॥ १३ ॥