Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तैसेंच त्या शाहाजी राजाचे भाउ शरफोजी राजानी अल्लीयदलशाहाचे फौजेशी निर्वाण युत्ध करून त्या फौजेसहीत सरदारांसह पराजय देऊन अल्लीयदलशाहाची फौज तमाम पळविली । पराजय पाऊन सैन्य समग्र अल्लीयदशाहा आदीकरून समग्रहीं कित्तेक दूर पळून गेल्यावरि त्या अल्लीयदल्शाहाकडील सरदारापैकीं जोहरखान् ह्मण्णार सरदारानें समग्रास इरेस घालून यादवराजे व मोगलाचे सरदार सर्वत्रासहीं परतून घेऊन पुन्हा युत्धास आले। तेव्हां मालोजी राजाचे द्वितयि पुत्र शरफोजी राजानी युत्धभार घेऊन शत्रुसैन्याभिमुख होऊन बहुत वेळ बहुताप्रकारें बहुत युत्धांची अंगें करून बहुत सैन्य शत्रूचे रणास आणून आपण हीं वीरस्वर्ग पावले । सवेंच त्यांचे वडील भाउ शाहजी राजानीं आपले चूलत भाऊ विठोजी राजाचे द्वितीय पुत्र खेलोजी राजास बरोबर घेऊन बहुत पराक्रमेंकडून युत्ध करून शत्रूस ताप देऊन परतून युत्धास आल्या जो जोहरखानसमवेत कित्तेक सरदारांस हीं मारून कित्तेक सरदारांस जीत धरून काराग्रहीं प्रवेश करऊन निर्वाण युत्ध केल्यांत अल्लीयदलशाहानी स्थिरून शाहजी राजाशी युत्ध करवनासें आले ते व पडाउ सांपडले सरदार जातां उरले ते सरदार व यादव राजे प्रभृतीसहीत छिन्नाभिन्न होऊन पळून गेले । तदनंतरें शाहजी राजे रणस्वाधीन जाहल्यानंतरें अंबरसेनापतीस पुढें करून निजामशाहा पादशाहापासीं येऊन खुरनिशी केले। तेव्हां निजामशाहानी शाहजीराजास विशेष मर्यादा विशेष बहुमान विशेष आदर केले । तदनंतरें विठोजी राजाचे लेंक खेलोजी राजानी शाहजी राजास झाला आदरमान आपल्यास हीं व्हावा ह्मणायाची अपेक्षा धरून सेनापति अंबरखानास केवळ अनुसरले । तेव्हां त्या सेनापति अंबरखानाचे चित्ती आपण सेनापति होऊन असून हीं शाहजी राजानी युत्धांत जय संपादिल्याकरितां पादशाहाचे समक्षेमांत आपल्या क्षेमाशतगुणें कडून अधीक मानाई जाहले कीं म्हणावेंयाचा मत्छर बहुत होता करितां शाहाजी राजाहून खेलोजी राजास विशेष दिसून