Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
जें ब्राह्मण तुला मारणें अह्मास धर्म नव्हें । आह्मी ब्राह्मण चरणरजास पूजा करितों; अह्मास गुरू देवस्थान ही ब्राह्मण झाल्याकरितां हाताची हत्यारा टाकून देऊन तुला जावें सारिखें असल्या सुखरूप जा; घाटा मोकळ्या करून देतें । अथवा येथेंच राहावें, तरि अन्न वस्त्रास चालवितो; राहा ह्मणून उदंडा रीतीनें सांगितल्याहीं त्या ब्राह्मणानें अैकनासें वारावरी वार चालविला, तो समग्र वोहडीत परतून पाहिनासें राजे चालिले; तेव्हां राजाचा खिसमजदार येकानें पाहून ब्राम्हण हट्टास पेटून मारितो, येखादा मार चुकून लागल्या कोट्यावधी जनांस पोस णार राजा जायां होईल, तत्रापि शस्त्र धरून मारणार ब्राह्मणास सुखें मारुय्ये ह्मणून त्या कृष्णाजी पंतास मारून दुधड केला । तो ब्राह्मण देवगतीस पावल्यावरि शिवाजीराजानी पूर्व संकेताप्रमाणें नगारा वाजविला । तो नाद अैकतांच जेथि तेथें लोक खवळून अफजलखानाची फौज तमाम मारून वरकड वजीरांस धरून फौजेंतील हत्ती घोडे तमाम लुटून राजापासीं आणून पावते केले; राजानी सांपळ्या वजीरांस बहुमान करून पाठविले । ते वजीर बहूतशेष थोडें होते ते तेहीं अल्लीयदल्शहापासी जाऊन साद्यंत वर्तमान जाणते केलें; अल्लीयदल्शहानीं अफजलखानाचें वर्तमान ऐकून दोन घटिका आपले ठांई खिन्न होऊन बहुत फौज सरदारेंहीं गेलें कीं ह्मणावयाचे व्यसनानें मग्न होऊन पुन्हा हम्म धरून शिवाजी राजावरि लडाई करावी ह्मणून फौज बंदी करूं लागलें; हे वर्तनान पेसजी शिवाजी राजे अफजलखानास मारणे निमित जावळीस नातेवेळेस पुने प्रांतचे राज्य समग्र नेतोजी ह्मणार सेनापतीस निरवून जावळींत आपण संकेत नगारा वाजविला । वर्तमान कळतांच चालावेंयांची घटिकही साम्न गेले होते तो नेतोजी म्हण्णार सेनापतीनें अफजल्खान दैवगतीस पावलें वर्तमान अैकून अल्लीयदल्शाहानी पुन्हां युत्धार्थ फौजबंदी करिताती ह्मणावयाचें